हवामान बदलाचे शेतीवर दुष्परिणाम
By Admin | Updated: March 27, 2015 23:42 IST2015-03-27T23:42:48+5:302015-03-27T23:42:48+5:30
हवामानातील बदलांमुळे भविष्यात शेतीवर परिणाम होईल. शेतातील पीकपद्धती आणि पावसाच्या प्रमाणात बदल होणार आहे. बाष्प उत्सर्जनाचे प्रमाण वाढेल.

हवामान बदलाचे शेतीवर दुष्परिणाम
पुणे : हवामानातील बदलांमुळे भविष्यात शेतीवर परिणाम होईल. शेतातील पीकपद्धती आणि पावसाच्या प्रमाणात बदल होणार आहे. बाष्प उत्सर्जनाचे प्रमाण वाढेल. शेतीचा पोत कमी होऊन, उत्पादनक्षमता कमी होईल. हे धोके टाळण्यासाठी त्या दृष्टीने सकारात्मक पावले टाकण्याची गरज आहे, अशी अपेक्षा पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी शुक्रवारी व्यक्त केली.
‘हवामानबदल : सामाजिक-आर्थिक परिप्रेक्षातून’ या विषयावर आयोजित प्रा. पी. आर. पिशारोटी व्याख्यानात ते बोलत होते. ‘इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी’ चे (आयआयटीएम) संचालक डॉ. एम. राजीवन, इंडियन मेट्रॉलॉजिकल सोसायटी पुणे चॅप्टरचे अध्यक्ष ए. के. सहाय यावेळी उपस्थित होते.
डॉ. गाडगीळ म्हणाले, ‘लोकसंख्या हे भारतातील हवामान बदलांचे मूळ कारण आहे. त्यामुळे मूलभूत स्रोतांवरचा ताण वाढत आहे. त्यातून सार्वजनिक आरोग्याच्या समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहेत. हवामानातील बदलांमुळे भविष्यात शेतीवर परिणाम होईल. शेतातील पीकपद्धती आणि पावसाच्या प्रमाणात बदल होणार आहे. बाष्प उत्सर्जनाचे प्रमाण वाढेल. शेतीचा पोत कमी होऊन, शेतजमीन क्षारपड होऊन तिची उत्पादन क्षमता कमी होईल. हे धोके टाळण्यासाठी सकारात्मक पावले टाकण्याची गरज आहे. सेंद्रिय शेती हा त्यावरचा एक प्रभावी मार्ग आहे. यासारख्या पर्यावरणपूरक शेतीला सरकारने प्रोत्साहन दिले पाहिजे.’ पैशाच्या वाढत्या हव्यासामुळे गोव्यासारख्या प्रदेशात यांत्रिक नौका खोल समुद्रात बेसुमार मासेमारी करीत आहेत. त्यामुळे समुद्रात तेलाचे प्रदूषण होत आहे, असे त्यांनी सांगितले.
४हवामान बदलांचा परिणाम वन आणि वन्य प्राण्यांवरदेखील होणार आहे. त्यासाठी समाजाने पुढाकार घेऊन केलेले सामूहिक प्रयत्न आणि वन हक्क कायद्याची काटेकोर अंमलबजावणी यातून देशातील वनक्षेत्राचे संवर्धन केले पाहिजे.
४देशातील वनांच्या संवधर्नासाठी सामूहिक प्रयत्नांची नितांत आवश्यकता आहे. पाचगाव (जि. चंद्रपूर) ने याचा वस्तुपाठ घालून दिला आहे, असेही ते म्हणाले.