शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'या'मुळेच १० ऑक्टोबरच्या मराठा समाजाच्या 'महाराष्ट्र बंद' ला वंचितचा पाठिंबा : प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 13:52 IST

भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनाही प्रकाश आंबेडकर यांनी फटकारले..

ठळक मुद्देपुण्यात प्रकाश आंबेडकरांच्या पत्रकार परिषदेचे गुरुवारी आयोजन

पुणे: मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे मराठा समाजात संतापाची लाट उसळलेली असून राज्यात ठिकठिकाणी निदर्शने, मोर्चे,आंदोलने करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.त्याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने येत्या १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला आता वंचित बहुजन विकास आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे, अशी माहिती डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. 

पुण्यात प्रकाश आंबेडकरांच्या पत्रकार परिषदेचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. आंबेडकर म्हणाले, मराठा समाजाच्या १० तारखेच्या मोर्चाला वंचितने पाठिंबा द्यावा, अशी विनंती सुरेश पाटील यांनी केली होती. तसेच आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजातील विविध संघटनांमध्ये अनेक गट तयार होण्याची शक्यता आहे. त्यापैकीच काहीजण भविष्यात आक्रमक भूमिका देखील घेतली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी काळात राज्यातील सामंजस्य बिघडू नये व त्यामुळे निर्माण होणारा धोका टाळण्यासाठीच वंचित बहुजन विकास आघाडी येत्या १० तारखेला आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा देणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

  या पत्रकार परिषदेत मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत ओबीसी गटातून मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी केली जाणार नाही, याची काळजी घेतली जावी. आणि दोन्ही समाजांनी आपापल्या भूमिकेवर ठाम राहावे, असे प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी आवर्जून सांगितले.  

 भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनाही  प्रकाश आंबेडकर यांनी फटकारले. मराठा समाजाला आरक्षण नाही तर सर्वांचेच आरक्षण रद्द करा, अशी बिनडोक भूमिका त्यांनी मांडली. भाजपने अशा नेत्याला राज्यसभेत पाठवलेच कसे, असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.

टॅग्स :PuneपुणेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षणUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले