कच्ची पपई खायला देणं महागात, गर्भपाताप्रकरणी सहा जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 04:26 IST2017-10-13T04:26:22+5:302017-10-13T04:26:41+5:30
सुनेचा गर्भपात करण्यासाठी तिला कच्ची पपई खायला देणा-या ६ जणांना विरार पोलिसांनी अटक केली. मुंबईला राहणाºया मोना पारेख यांचा अर्पणसोबत विवाह झाला.

कच्ची पपई खायला देणं महागात, गर्भपाताप्रकरणी सहा जणांना अटक
वसई : सुनेचा गर्भपात करण्यासाठी तिला कच्ची पपई खायला देणा-या ६ जणांना विरार पोलिसांनी अटक केली. मुंबईला राहणाºया मोना पारेख यांचा अर्पणसोबत विवाह झाला. लग्नानंतर तिचे सासरच्यांंशी खटके उडायला लागले. दरम्यान, मोना गर्भवती असल्याची बातमी त्यांना कळली. त्यांनी तिला कच्ची पपई खायला दिली. त्यामुळेच गर्भपात झाल्याची तक्रार मोनाने पोलिसांत केली. या तक्रारीवरून भारतीय दंड विधान कलम ३१३ अन्वये अर्पणसह सासू संगीता, सासरा रमेश, दीर केतन आणि आत्या रंजन यांना अटक केली. त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली.