'मनसे'च्या नव्या झेंड्याला दानवेंचा आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 12:45 IST2020-01-23T12:41:02+5:302020-01-23T12:45:48+5:30
राजमुद्रा आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने वापरले नाही.

'मनसे'च्या नव्या झेंड्याला दानवेंचा आक्षेप
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं महाअधिवेशन आज मुंबईत पार पडत आहे. मनसेचा नवा झेंडा कसा असेल याची अनेकांना उत्सुकता होती. या महाअधिवेशनात ढोल ताशांच्या गजरात मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण करण्यात आलं आहे. मात्र 'मनसे'च्या या नव्या झेंड्यावर केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवेंनी आक्षेप घेतला आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, मनसेच्या आजच्या महाअधिवेशनात सावरकरांचे फोटो लावण्यात आले आहे. मात्र फक्त फोटो लावून चालत नाही, तर त्यांनी सावरकरांचे विचार सुद्धा आपल्या डोक्यात घालावे असा टोलात्यांनी मनसेला लगावला.
तर पुढे बोलताना त्यांनी मनसे'च्या नव्या झेंड्यावर राजमुद्रा वापरण्यात आल्याने त्यावर सुद्धा आपले मत मांडले. राजमुद्रा आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने वापरले नाही. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाच्या ध्वजावर राजमुद्रा असू नयेत असा आक्षेप दानवेंनी यावेळी घेतला.