पोलीसकन्या रविजा सिंगल अवघ्या एकोणीसाव्या वर्षी आयर्नमॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 22:13 IST2018-12-02T22:07:11+5:302018-12-02T22:13:12+5:30
आशिया खंडातील सर्वात तरुण आयर्नमॅन होण्याचा मान

पोलीसकन्या रविजा सिंगल अवघ्या एकोणीसाव्या वर्षी आयर्नमॅन
नाशिक : पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या कन्या रविजा रवींद्रकुमार सिंगलनं वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षी आयर्नमॅन खिताब पटकावला आहे. ऑस्ट्रेलियात अतिशय खडतर स्पर्धा पूर्ण करत तिनं आयर्नमॅन होण्याचा मान मिळवला. रविजानं 16 तास ५ मिनिटं 50 सेकंदांमध्ये ही स्पर्धा पूर्ण केली असून ती आशिया खंडातील सर्वात तरुण आयर्नमॅन ठरली आहे.
काही दिवसांपूर्वीच रविजाचे वडील अर्थात पोलीस आयुक्त डॉ. सिंगल यांनी देखील ही खडतर स्पर्धा पूर्ण करीत आयर्नमॅन होण्याचा मान मिळवला होता. आता त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत रविजानं ही किमया साधली आहे. आयर्नमॅन होण्याचा मान मिळवणारी ती भारताची पहिलीच तरुणी आहे. रविजानं वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी मिळवलेल्या या यशाचं सर्वत्र कौतुक होतं आहे. विशेष म्हणजे रविजा अभ्यासातदेखील तितकीच हुशार आहे.