शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

“...तर नवनीत राणा आता केंद्रात मंत्री झाल्या असत्या”: रवी राणा स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 17:35 IST

Ravi Rana News: नवनीत राणा यांचाच नाही तर अमरावती जिल्ह्याच्या विकासाचा पराभव झाला आहे. विकास थांबला आहे, असा दावा रवी राणा यांनी केला.

Ravi Rana News: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. यातच अनेक विषयांवरून महाविकास आघाडीचे नेते महायुती सरकारवर टीका करताना पाहायला मिळत आहेत. महायुतीतील नेतेही पलटवार करत आहेत. लोकसभेप्रमाणे विधानसभेत चित्र दिसावे, यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील असून, सत्ता कायम राखण्याचे आव्हान महायुतीसमोर आहे. यातच अपक्ष आमदार रवी राणा यांनी पत्नी नवनीत राणा यांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाविषयी मोठे भाष्य केले आहे. सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. रवी राणा हेही  जोरदार तयारीला लागले आहेत. रवी राणा यांनी मतदारसंघातील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी नवनीत राणा यांच्या पराभवाबद्दल विधान केले.

मागील लोकसभा निवडणूक नवनीत राणा यांनी अपक्ष म्हणून लढवली होती आणि विजय मिळवला होता. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी भाजपामध्ये प्रवेश करून पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली. मात्र, बच्चू कडू हे नवनीत राणा यांच्या उमेदवारीबाबत नाराज होते. यातच काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणा यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव केला. यासंदर्भात रवी राणा यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. 

नवनीत राणा लोकसभा निवडणूक जिंकली असती, तर...

गेली पाच वर्षे नवनीत राणा यांनी अनेक विकास कामे केली. त्यांनी लोकांशी चांगला जनसंपर्कही ठेवला. मात्र तरी त्यांना निवडणुकीत घरी बसावे लागले. नवनीत राणा जर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आल्या असत्या, तर केंद्रीय मंत्री झाल्या असत्या. नवनीत राणा यांनी गेली पाच वर्षे विकास केला. खूप मेहनत केली. पण आता ती खड्ड्यात गेली. अमरावतीत आता अशी हवा आली आहे की, जो २० दिवसांपूर्वी आला तो निवडून आला. जर असेच होत राहिले तर राजकारणात चांगले लोक राहणार नाहीत, असे रवी राणा म्हणाले.

दरम्यान, नवनीत राणा यांचाच नाही तर अमरावती जिल्ह्याच्या विकासाचा पराभव झाला आहे. काही मूठभर नेत्यांनी ठरवले होते की, नवनीत राणा यांचा पराभव करायचा, पण लक्षात ठेवा त्यांच्या मनासारख झाले असले तरी या जिल्ह्याचा विकास थांबला आहे. काही नेत्यांनी मला पाडायचे हे ठरवले असले तरीही जनतेची ताकद माझ्यासोबत आहे. ते मला धक्का लागू देणार नाही, असा विश्वास रवी राणा यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ravi Ranaरवी राणाRavi Ranaरवि राणाnavneet kaur ranaनवनीत कौर राणा