शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

रत्नागिरी : बावनदीतून ३७ गावांसाठी प्रादेशिक नळपाणी योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 15:29 IST

रत्नागिरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची समस्या गंभीर होत आहे. त्यावर उपाय म्हणून १३ ग्रामपंचायतींअंतर्गत येणा-या मि-या, कुवारबाव, शिरगाव, निवळीसह ३७ महसुली गावांसाठी सुमारे ९० कोटी खर्चाची प्रादेशिक नळपाणी योजना बावनदीतील पाण्याचा वापर करून राबविली जाणार आहे. त्यासाठी जीवन प्राधिकरण विभागाकडून आवश्यक सर्वेक्षण सुरू झाले आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची समस्या गंभीर होत आहे. त्यावर उपाय म्हणून १३ ग्रामपंचायतींअंतर्गत येणा-या मि-या, कुवारबाव, शिरगाव, निवळीसह ३७ महसुली गावांसाठी सुमारे ९० कोटी खर्चाची प्रादेशिक नळपाणी योजना बावनदीतील पाण्याचा वापर करून राबविली जाणार आहे. त्यासाठी जीवन प्राधिकरण विभागाकडून आवश्यक सर्वेक्षण सुरू झाले आहे. येत्या तीन महिन्यात या प्रादेशिक योजनेचा प्रस्ताव जीवन प्राधिकरणाकडून शासनाकडे पाठवला जाणार आहे.ही ३७ महसुली गावे रत्नागिरी नगर परिषदेच्या जवळच्या परिसरात वसलेली असल्याने येथील लोकसंख्या वाढीचे प्रमाण अधिक आहे. सध्या रत्नागिरी नगर परिषदेची लोकसंख्या ७७ हजार आहे. या ३७ गावांमध्ये २०११च्या जनगणनेनुसार ७६ हजार ६८९ एवढी लोकसंख्या आहे. सन १९३५मध्ये ही लोकसंख्या १ लाख ११ हजार ६३७ असेल, असे गृहीत धरण्यात आले आहे. या गावांची पाण्याची मागणीही मोठी आहे. ही मागणी बावनदीतील मुबलक पाणी साठ्यामुळे पूर्ण  होऊ शकेल. या योजनेचे सर्वेक्षण, अंदाजपत्रके व आराखडे यांची महाराष्टÑ जीवन प्राधिकरणमार्फत पूर्तता व्हावी, असा ठराव जिल्हा परिषदेने ६ जून २०१७ रोजी केला होता. याबाबत २१ नोव्हेंबर २०१७ रोजी आमदार सामंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. १३ गु्रप ग्रामपंचायतींअंतर्गत येणा-या ज्या ३७ गावांना या प्रादेशिक नळपाणी योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामध्ये मि-या, जाकीमि-या, सडामिºया, शिरगाव, आडी, तिवंडेवाडी, झाडगाव, मुसलमानवाडी, निवळी, रावणंगवाडी, धनावडेवाडी, काजरेकोंड, कपिलनगर, करबुडेकोंड, कुंभारवाडा, मूळगाव, वेद्रेवाडी, डांगेवाडी, हातखंबा, तारवेवाडी, पानवल, घवाळेवाडी, खेडशी, गयाळवाडी, पोमेंडी बुद्रुक, कारवांचीवाडी, कुवारबाव, मिरजोळे, मधलीवाडी, ठिकाणवाडी, पाडावेवाडी, शीळ, नाचणे, आंबेशेत, कर्ला, मुसलमानवाडी, जुवे या महसुली गावांचा समावेश आहे. या योजनेचा समावेश मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल सन २०१८-१९ च्या कृती आराखड्यात करण्यात आला आहे. या ३७ पैकी अनेक महसुली गावांमध्ये नळपाणी योजना आहेत. त्यातील काही योजनांना एमआयडिसीकडून पाणी पुरवठा केलो जात आहे. तर काही योजना काही धरणांवर अवलंबून आहेत. उन्हाळ्यात टंचाईला सामोरे जावे लागत आहे. 

तारांगणसाठी ७ कोटी : रत्नागिरी योजनेबाबत आठवडाभरात निर्णयरत्नागिरी नगर परिषदेच्या नळपाणी योजनेचा निर्णय आठवडाभरात होईल. शहरात सव्वा कोटीच्या तारांगण प्रकल्पाला ७ कोटी मंजूर झाले आहेत. गणपतीपुळे आराखड्यासाठी २० कोटी तरतूद झाली आहे. जिल्ह्यातील जलसंधारणच्या १२ प्रकल्पांची रखडलेली कामे सुरू होणार आहेत. भगवती बंदर ब्रेक वॉटरवॉल ७५० मीटर लांबीची होणार असून, त्यासाठी १३० कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात येणार आहे. जयगड नळपाणी योजनेसाठी २७ कोटी मंजूर झाले आहेत. यासाठी रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी प्रयत्न केले होते. 

टॅग्स :WaterपाणीRatnagiriरत्नागिरी