शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

तिढा सुटला, मार्ग सापडला ‘रत्नागिरी गॅस’ची टर्बाईन्स पुन्हा धडधडणार

By admin | Updated: May 22, 2015 00:15 IST

अन्य राज्यातील वीज मंडळांशीही चर्चा.-विदेशी इंजिनिअर्स येणार

श्रीकर भोसले - गुहागर रत्नागिरी गॅस आणि भारतीय रेल्वेमधील वीज खरेदी वाटाघाटी अंतिम टप्प्यात असून, लिलाव प्रक्रियेतून कमी दरातील गॅस पुरवठादेखील उपलब्ध होणार आहे. कंपनीची अन्य राज्यांच्या वीज मंडळांशीदेखील वीज खरेदीबाबत चर्चा सुरु आहे. तब्बल दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर रत्नागिरी गॅसची टर्बाईन्स आता पुन्हा धडधडणार आहेत.सुमारे २५ हजार कोटींच्या रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पाचे भवितव्य अंधारात गेल्याचे चित्र निर्माण झाले होते. गेली जवळपास दोन वर्षे प्रकल्पातून वीजनिर्मिती बंद आहे. प्रकल्पातील यांत्रिक सामुग्री सुस्थितीत ठेवण्यासाठी ठराविक काळाने काही वेळासाठी टर्बाइन्स सुरु केली जात होती. मागील दोन वर्षात टप्प्याटप्प्याने येथील कर्मचारीवर्ग कमी करण्यात येत होता. अशा परिस्थितीत हा प्रकल्प पूर्णपणे बंद होणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच राज्य सरकारने वीज खरेदी करारही रद्द केल्याने उरलीसुरली आशादेखील संपली होती. एनटीपीसी या कर्मचाऱ्यांनाही कमी करुन कंपनीच्या अन्य ठिकाणच्या प्रकल्पांमध्ये सामावून घेण्यात आले होते. नुकत्याच झालेल्या लिलावामधून कंपनीला कमी दरात गॅस उपलब्ध होईल. तसेच रेल्वेकडून विजेची मागणी असून, साधारणपणे दर तीन ते चार महिन्यांनी कराराचे नूतनीकरण होईल. ही मागणी ३०० मेगावॅट इतकी असू शकते. कंपनीला उपलब्ध होणाऱ्या गॅसपासून एका टप्प्यातील वीजनिर्मिती होऊ शकते. साधारणपणे ६२० मेगावॅट वीजनिर्मिती होईल. कंपनीतील विविध विभागातील कमी करण्यात आलेल्या कंत्राटी स्थानिक कर्मचाऱ्यांनाही परत कामावर घेतले जात असल्याने कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दाभोळ प्रकल्पाच्या अस्तानंतर नव्याने स्थापन करण्यात आलेल्या रत्नागिरी गॅसमध्ये एनटीपीसी व गेलची प्रत्येकी ३२.९ टक्के हिस्सेदारी आहे. राज्य सरकारची १७.४ टक्के, तर दाभोळमधील भांडवली गुंतवणूकदार बँकांची मिळून १६.८ टक्के हिस्सेदारी आहे. विविध कारणांमुळे भवितव्य अस्थिर असलेल्या या प्रकल्पाच्या पुन्हा सुरु होण्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. प्रकल्प बंद अवस्थेत असतानाही खर्चाचा गाडा हाकणे ही कंपनी प्रशासनाला तारेवरची कसरत बनली आहे.विदेशी इंजिनिअर्स येणारदरम्यान, अन्य ठिकाणी वर्ग करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांपैकी १० अभियंत्यांना एनटीपीसीने परत रत्नागिरी गॅसमध्ये पाचारण केले आहे. मूळच्या दाभोळ प्रकल्पाची यांत्रिक बांधणी करणाऱ्या जनरल इलेक्ट्रिकल्स कंपनीच्या विदेशी इंजिनिअर्सची टीमही दाखल होत आहे. ५ जूनपासून कंपनीतील टर्बाईन्स पुन्हा धडधडणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.अन्य राज्यातील वीज मंडळांशीही चर्चा.-साधारणपणे ६२० मेगावॅट वीजनिर्मिती होण्याचा अंदाज.रत्नागिरी गॅसमध्ये एनटीपीसी व गेलची प्रत्येकी ३२.९ टक्के हिस्सेदारी.राज्य सरकारची १७.४ टक्के, तर दाभोळमधील बँकांची मिळून १६.८ टक्के हिस्सेदारी.