रश्मी शुक्ला बनल्या राज्याच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक; ‘लोकमत’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 06:36 AM2024-01-05T06:36:19+5:302024-01-05T06:37:48+5:30

४ ऑक्टाेबर २०२३ राेजी ‘लाेकमत’ने रश्मी शुक्ला यांचे नाव महासंचालकपदासाठी आघाडीवर असल्याचे वृत्त दिले हाेते. 

Rashmi Shukla becomes the state's first woman Director General of Police; Stamped on the news of Lokmat | रश्मी शुक्ला बनल्या राज्याच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक; ‘लोकमत’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब

रश्मी शुक्ला बनल्या राज्याच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक; ‘लोकमत’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब

मुंबई : भारतीय प्रशासकीय सेवेतील पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती केली आहे. शुक्ला यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्राला पहिल्यांदाच महिला पोलिस महासंचालक मिळाल्या आहेत. महासंचालकपदासाठी रश्मी शुक्ला यांचे नाव आघाडीवर असल्याचे वृत्त सर्वांत आधी ‘लोकमत’ने दिले होते.  

रजनीश सेठ ३१ डिसेंबर रोजी निवृत्त झाल्यानंतर मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. त्यानंतर चार दिवसांनी सरकारने रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले.  राज्यात सर्वांत वरिष्ठ पोलिस अधिकारी असल्याने त्यांच्याकडे जबाबदारी दिली आहे.

कार्यालयीन कामाप्रति समर्पण 
कार्यालयीन कामाप्रति समर्पण हा रश्मी शुक्ला यांचा विशेष गुण मानला जातो. तसेच कोणतेही काम पेंडिंग न ठेवणाऱ्या अधिकारी असा त्यांचा लौकिक आहे. पोलिस शिपाई ते पोलिस निरीक्षक या खालच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या कल्याणाकडे नेहमीच विशेष लक्ष देणाऱ्या अधिकारी म्हणूनही त्यांची पोलिस दलात ओळख आहे. त्या १९८८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. 

४ ऑक्टाेबर २०२३ राेजी ‘लाेकमत’ने रश्मी शुक्ला यांचे नाव महासंचालकपदासाठी आघाडीवर असल्याचे वृत्त दिले हाेते. 

अशी आहे कारकीर्द 
- रश्मी शुक्ला या हैदराबादच्या नॅशनल पोलिस अकादमीतून उत्तीर्ण झाल्या आहेत. महाराष्ट्र पोलिस सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांनी महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी विशेष काम केले. त्यासाठी त्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांत महिलांसाठी समुपदेशन केंद्र सुरू केले. 
- नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयक म्हणून काम केले होते. 
- २०१६ ते २०१८ या कालावधीत त्यांनी पुण्याच्या पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळली. 
- रश्मी शुक्ला यांना २००४ साली पोलिस महासंचालक पदक, २००५ मध्ये उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक आणि २०१३ मध्ये पोलिस मेडल मिळाले आहे. 
- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१८ मध्ये त्यांची राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली होती. 
- पुढे फेब्रुवारी २०२१ मध्ये त्या 
केंद्रीय राखीव पोलिस दलात अतिरिक्त पोलिस महासंचालकपदी प्रतिनियुक्तीवर गेल्या होत्या. 
 

Web Title: Rashmi Shukla becomes the state's first woman Director General of Police; Stamped on the news of Lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.