भाईंदरमध्ये ‘आप’च्या कार्यकर्तीवर बलात्कार

By Admin | Updated: July 22, 2014 01:44 IST2014-07-22T01:44:57+5:302014-07-22T01:44:57+5:30

कार्यकर्तीला एसएमएस केल्याचा डाव साधून ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी धर्मेद्र उमाशंकर सिंह (32) याला नवघर पोलिसांनी अटक केली आहे.

Rape of AAP activist in Bhayander | भाईंदरमध्ये ‘आप’च्या कार्यकर्तीवर बलात्कार

भाईंदरमध्ये ‘आप’च्या कार्यकर्तीवर बलात्कार

भाईंदर : आम आदमी पार्टी (आप) च्या विवाहित कार्यकर्तीला एसएमएस केल्याचा डाव साधून ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी धर्मेद्र उमाशंकर सिंह (32) याला नवघर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला 25 जुलैर्पयत पोलीस कोठडी मिळाली आह़े
महिला कार्यकर्तीला पक्षाच्या कामानिमित्त फोन करून याच पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या धर्मेद्रने जवळीक साधली होती. ही जवळीक मोबाइलवरील एसएमएसने वाढली. त्याचा फायदा घेत त्याने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी ब्लॅकमेल केले. तसे न केल्यास एसएमएसची बाब पीडित महिलेच्या पतीला सांगण्याची धमकीही त्याने दिली. (प्रतिनिधी)

 

Web Title: Rape of AAP activist in Bhayander