शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

लोकमतच्या मंचावर रणबीर झाला संजूबाबा

By admin | Updated: April 13, 2017 22:05 IST

संजय दत्तच्या आगामी बायोपिकमध्ये रणबीर कपूर "खलनायक" संजूबाबाची भूमिका साकारत असल्याचे तुम्हाला माहिती असेलच.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 13 -  संजय दत्तच्या आगामी बायोपिकमध्ये रणबीर कपूर "खलनायक" संजूबाबाची भूमिका साकारत असल्याचे तुम्हाला माहिती असेलच. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. "मुन्नाभाई सिरीज", "३ इडियट्स", पीके फेम दिग्दर्शक राजकुमार हिराणी हा चित्रपट दिग्दर्शित करीत आहेत. या चित्रपटात संजय दत्त सारखं दिसण्यासाठी  रणबीर कपूर प्रचंड मेहनत घेत आहे. मंगळवारी लोकमतचा महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर पुरस्कार सोहळा पार पडला. अभिनेता रणबीर कपूरला लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार-2017 मधील आऊटस्टॅडिंग एन्टरटेनर ऑफ द इयर (पुरुष) कॅटेगरीतील पुरस्काराने गौरविण्यात आले. अनुज पोद्दार बिझनेस हेड कलर्स मराठी यांच्या हस्ते त्याला हा पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आला. याच खास क्षणाचं औचित्य साधत लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी रणबीर कपूरची मुलाखत घेतली. रणबीरला त्यांनी यावेळी विविध प्रश्न विचारले. त्याची रणबीरनंही दिलखुलास उत्तरंसुद्धा दिली. मुलाखत सुरु असताना ऋषी दर्डा यांनी संजय दत्तवरील चित्रपटाच्या विषयाला हात घातला. यावेळी रणबीरला संजय दत्तचा वॉक करुन दाखवण्याची आणि त्याचा एखादा डायलॉग बोलून दाखवण्यासही सांगितले. संजय दत्तच्या चालण्याच्या शैलीचे सगळेच फॅन आहेत. त्यामुळे रणबीरनं मोठ्या खिलाडूवृत्तीने संजूबाबाचा प्रसिद्ध वॉक करुन उपस्थितांची मनं जिंकली. रणबीर यावरच थांबला नाही तर संजय दत्त बोलतो कसा हे सुद्धा दाखवून दिलं. संजय दत्तसारखा वॉक करता करता त्यानं संजय दत्तच्या खास स्टाईलमध्ये कसं काय येरवडा असा डायलॉग म्हटला. त्यावेळी उपस्थितांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्याचे कौतुक केले.

मंगळवारी लोकमतचा महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर हा सोहळा पार पडला या सोहळ्यात दिग्गजांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. युपीएएल प्रस्तुत लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पॉवर्ड बाय कर्म आणि अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने साकारण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रात आपल्या कार्याची छाप पाडणाऱ्या महाराष्ट्रातील व्यक्तिमत्त्वांना गौरवण्यात आले. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर च्या चौथ्या पर्वात "लोकसेवा-समाजसेवा", "परफॉर्मिंग आर्ट्स", "कला", "क्रीडा", रंगभूमी, मराठी चित्रपट, "उद्योग", ह्यपायाभूत सेवाह्ण, "राजकारण", "प्रशासन (आश्वासक)" आणि वैद्यकीय यामधील 14 पुरस्कारांच्या व्यतिरिक्त स्पर्धेच्या पलीकडे जाणारे उत्तुंग कर्तृत्व सिद्ध केलेल्या सहा महनीय व्यक्तींना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.