शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांच्या हावभावावरून विधानसभेत रणकंदन

By admin | Updated: March 12, 2015 01:37 IST

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे आमदार डॉ.सतीश पाटील यांच्याकडे पाहत मारण्याचा हावभाव केल्यामुळे विधानसभेत

मुंबई : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे आमदार डॉ.सतीश पाटील यांच्याकडे पाहत मारण्याचा हावभाव केल्यामुळे विधानसभेत आज प्रचंड गदारोळ झाला. ‘आपण मंत्री आहात; जबाबदारीने वागा. यापुढे असे होता कामा नये, अशी समज अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी महाजन यांना दिली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होताना छगन भुजबळ यांनी आपल्या खास शैलीत सरकारवर तोफ डागली. दमणगंगा-पिंजाळ प्रकल्प आणि तापी-नारपार या महाराष्ट्र-गुजरात आंतरराज्य नदीजोड प्रकल्पांद्वारे महाराष्ट्राचे ११० टीएमसी पाणी गुजरातला पळविले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तेव्हा या बाबतचा सामंजस्य करार २०१० मध्ये आघाडी सरकारच्या काळातच झाला आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. भुजबळ बोलत असतानाच भाजपाचे चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील हरकतीच्या मुद्यावर उभे राहिले आणि त्यांनी भुजबळ यांना लक्ष्य केले. तुमच्या सरकारच्या काळात करार होत असताना हा विचार आला नाही का? महाराष्ट्राचे पाणी पळविण्याची चिंता करता पण उत्तर महाराष्ट्रात मांजरापाड एक प्रकल्पाद्वारे येवला तालुक्याला तुम्हीच पाणी पळविले. अन्य भागाला पाणी पुरवू शकणारा मांजरापाड २ प्रकल्प हाती का घेतला नाही, असा सवाल त्यांनी केला. यावर, राष्ट्रवादीचे एरंडोलचे आमदार डॉ.सतीश पाटील यांनी गुजरातशी केलेले करार नव्या सरकारने रद्द करावेत, उगाच आधीच्या सरकारवर खापर का फोडता, असे सुनावले. त्याचवेळी सभागृहात आलेले जलसंपदा मंत्री महाजन यांनी पाटील यांच्याकडे मूठ आवळून मारण्याची अ‍ॅक्शन केल्याने सभागृहात एकच गदारोळ झाला. सत्तारुढ आणि विरोधकांमध्ये प्रकरण हमरीतुमरीवर येतेय असे वाटत असतानाच या गदारोळात अध्यक्षांनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर माजी मंत्री जयंत पाटील यांनी महाजन यांनी सभागृहाची माफी मागावी, अशी मागणी केली. अध्यक्षांनी महाजन यांना त्यांच्या वर्तवणुकीबद्दल समज दिली. (विशेष प्रतिनिधी)