Video : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरेंचा आत्महत्येचा प्रयत्न; फेसबुक लाईव्हवर विषप्राशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2022 16:24 IST2022-10-16T16:23:40+5:302022-10-16T16:24:37+5:30
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी फेसबुक लाईव्हवर आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या कृत्यामुळे एकच उडाली आहे.

Video : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरेंचा आत्महत्येचा प्रयत्न; फेसबुक लाईव्हवर विषप्राशन
मुंबई:मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी फेसबुक लाईव्हवर आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या कृत्यामुळे मराठा समाजात एकच उडाली आहे. फेसबुक लाईव्हवर रमेश केरे यांनी विष प्राषन केल्यानंतर, त्यांना तातडीने जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोशल मीडियावर बदनामी केल्याच्या आरोप रमेश केरे यांनी केला आहे.
'गेल्या काही दिवसांमध्ये माझ्यावर चुकीचे आरोप झाले, त्यामुळे माझी नाहक बदनामी केली. मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर माझ्याविरोधात काम सुरू आहे. हे माझे शेवटचे फेसबुक लाईव्ह आहे. मागील काही दिवसांपासून ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. चंद्रकांत पाटील यांना उपसमितीच्या अध्यक्षपदी घेतले, मी त्यांच्या नावाला विरोध केला होता. त्यांच्याजवळच्या माणसांनी मला त्रास दिला, जाणीवपूर्वक मला बदनाम केले. त्यामुळे मी माझे आयुष्य संपवत आहे.'
'मी आजवर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत आलोय, पण सोशल मीडियावर माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सगळ्यांची चौकशी करा, सगळ्या दोषींना शिक्षा झाली पाहिजे. ज्या लोकांनी सीबीआय, सीआयडीच्या माध्यमातून जी ऑडिओ क्लिप व्हायरल केली असेल, त्याची चौकशी केली पाहिजे. आशा, अक्षर, गौरी मला माफ करा,' असे म्हणत त्यांनी विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना रूग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये काय?
मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियात एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत होती. त्यामध्ये मराठा समन्वयक रमेश केरे यांचा उल्लेख होता. मराठा क्रांती मोर्चाच्या वेळी आर्थिक व्यवहार झाले आणि आंदोलन संपवण्यासाठी प्रयत्न झाला, अशाप्रकारचे संभाषण त्यात आहे. त्यावर रमेश केरे यांनी कोणतेही कृत्य केले नसल्याचे सांगतिले, पण त्यांच्यावरील आरोप सुरूच राहिले.