रामदास कदम-अनिल परब यांच्यात जुंपली; बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल, कदमांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 08:38 PM2024-04-02T20:38:25+5:302024-04-02T20:40:14+5:30

उद्धव ठाकरे हे अनिल परब यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून माझ्यावर आरोप करत असावेत असा आरोप रामदास कदमांनी लावला.

Ramdas Kadam denies the scam allegations made by Anil Parab | रामदास कदम-अनिल परब यांच्यात जुंपली; बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल, कदमांचा इशारा

रामदास कदम-अनिल परब यांच्यात जुंपली; बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल, कदमांचा इशारा

गुहागर - Ramdas Kadam on Anil Parab ( Marathi News ) माझ्यावरील आरोप बिनबुडाचे आणि चुकीचे आहेत. बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल अशा शब्दात शिवसेना नेते रामदास कदमांनीअनिल परब यांच्यावर पलटवार केला आहे. अनिल परब यांनी कदमांवर घोटाळ्याचे आरोप लावले होते. त्याचसोबत ही कागदपत्रे सोमय्यांना देतो, त्यांनी पाठपुरावा करून ईडी चौकशी मागणी करण्याची हिंमत दाखवावी असं अनिल परब यांनी म्हटलं होतं. त्यावर रामदास कदमांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

रामदास कदम म्हणाले की, अनिल परब हे साई रिसोर्ट प्रकरणी स्वत: वादग्रस्त झालेत. माझ्या मुलाला पालकमंत्री असताना संपवण्याचा प्रयत्न अनिल परब यांनी केला. हा प्रयत्नही फसला. त्यामुळे आता माझ्यावर जे आरोप केलेत. विशेषत: शिवतेज संस्थेच्या इमारती २००७ सालापासून बांधकाम झालं, २००९ पासून तिथे डेंटल कॉलेज सुरू आहे. १३-१४ वर्षांनी यांना प्रकाश पडला, शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या सर्व इमारती अधिकृत आहेत. एकही इमारत अनधिकृत नाही. कुठल्याही पूरनियंत्रण रेषेखाली नाहीत. रामदास कदमांना बदनाम करण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन चुकीचे आरोप केलेत. त्याबाबत मुंबईत जावून वकिलांशी सल्ला घेत अनिल परब यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असा इशारा त्यांनी दिला. 

तसेच उद्धव ठाकरे हे अनिल परब यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून माझ्यावर आरोप करत असावेत. रामदास कदमांनी एकही काम अपवाद म्हणूनही चुकीचे केले नाही. कितीही पत्रकार परिषद घेतल्या तरी त्याला गांभीर्याने घेत नाहीत. माझ्याकडे अनेक प्रकरणे आहेत. ज्यावेळी सगळी कागदपत्रे घेऊन मी उतरेन तेव्हा पळताभुई होईल. योग्य वेळी योग्य ते उत्तर देईन. अनिल परबांचे आरोप काय काय आहेत ते बघून पुढचा निर्णय घेईन. शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या माध्यमातून खेड तालुक्यात मोठं शैक्षणिक काम सुरू आहे. वृद्धाश्रम मोफत सुरू आहे. सैनिक स्कूल सुरू आहेत असं रामदास कदमांनी म्हटलं. 

दरम्यान, रामदास कदमांनी खेड तालुक्यात शैक्षणिक साम्राज्य उभं केले आहे. तुमची एवढी हिंमत आहे का? जितकी प्रकरणे आहेत लवकर बाहेर काढा. हाताला काही लागणार नाही. कितीही प्रयत्न केले योगेश कदम हे मोठ्या मताधिकाऱ्याने दापोलीतून पुन्हा निवडून येतील असंही रामदास कदमांनी सांगितले. 

काय होते आरोप?

खेड महापालिकेचा हरित पटेचा भूखंड रामदास कदम यांनी कायद्याचे उल्लघंन करून हा भूखंड ताब्यात घेतला आहे व त्याठिकाणी शिवतेज संस्था बांधली आहे या प्रकरणाची कायदेशीर चौकशी करण्यात यावी असे शिवसेना नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत मागणी केली होती.

Web Title: Ramdas Kadam denies the scam allegations made by Anil Parab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.