उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठीच्या मु्द्द्यावरून आज एकाच व्यासपीठावर आले होते. यावरून आता केंद्रीय मंत्री रामदास अठावले यांची प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले, दोघेही मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले आहेत. ही चांगली गोष्ट आहे. आम्हालाही मराठीचा अभिमान आहे. मराठी सर्वांनाच बोलता यायला हवी, हेही खरेच आहे.
महाविकास अघाडीत फूट पडेल - रामदास आठवले यांनी दावा केला की, "दोन्ही भावांच्या एकत्र येण्याने आमच्या महायुतीलाच (एनडीए) अधिक फायदा होईल. कारण महाविकास आघाडीमध्ये (एमव्हीए) फूट पडेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी (सपा) वेगळे राहतील. उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडावे लागेल. कारण,आपल्याला सोबत चालायचे असेल, तर इतर कुणाचीही आवश्यकता नाही, असे राज ठाकरे यांचे म्हणणे आहे."
'बघूया किधीपर्यंत सोबत राहतात...' -IANS या वृत्तसंस्थेशी बोलताना केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले, "दोघेही एकत्र आले आहेत. बघूया किती दिवस सोबत राहतात. अद्याप केवळ मराठीच्याच मुद्द्यावर एक आले आहेत. मराठीच्या मुद्द्यावर त्यांनी रॅलीचे आयोजन केले होते, मात्र, तिची हवा काढण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. रॅलीपूर्वीच फडणवीस यांनी शाळेत हिंदी शिकवण्याचा जो सरकारी आदेश काढण्यात आला होता, तो रद्द केला आहे."
यांच्या विजय मेळाव्याला काही अर्थनाही, हा मेळावा तर... -रामदास अठावले पुढे म्हणाले, "यांच्या विजय मेळाव्याला काही अर्थनाही, हा मेळावा तर आम्ही करायला हवा होता. महायुती सरकारने तो सरकारी आदेश रद्द केला आहे. मात्र यांना वाटते की, आपल्या रॅलीमुळेच हा जीआर रद्द केला आहे, मात्र असे नाही. सर्व मराठी लोकांच्या भावना लक्षात घेत आमच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे. दोघे भाऊ एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही. उद्धव ठाकरेंकडे आता शिवसेना नाही. खरी शिवसेना एकनाथ शिंदेंकडे गेली आहे. यामुळे अधिकांश लोक एकनाथ शिंदेंसोबत आहेत.40 आमदार एकनाथ शिंदेंसोबत आले."
"राज ठाकरेंकडे एकही आमदार नाही" -या बरोबर, "राज ठाकरे यांच्या मोठ-मोठ्या सभा होतात. ही फार चांगली गोष्ट आहे. ते वक्ता म्हणून राज ठाकरे हे एक जबरदस्त नेते आहेत.मात्र, त्यांना मते मिळत नाहीत. सध्या त्यांचा एकही आमदार नाही. एकेकाळी १३ आमदार निवडून आले होते. दोघांच्या एकत्र येण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही फरक पडणार नाही. जर काही फरक पडलाच, तर तो महाविकास आघाडीलाच पडेल," असेही आठवले म्हणाले.