प्रकाश आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टीचं अध्यक्षपद घ्यावं, मी त्या पक्षात...; आठवलेंनी दिली ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 00:53 IST2022-02-22T00:51:49+5:302022-02-22T00:53:33+5:30
राजकीय ऐक्यासाठी रामदास आठवलेंचं प्रकाश आंबेडकरांना आवाहन

प्रकाश आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टीचं अध्यक्षपद घ्यावं, मी त्या पक्षात...; आठवलेंनी दिली ऑफर
वाळूज: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षात सर्वांनी एक होऊन पक्ष मजबूत करावा, असं आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केले. वाळूज महानगरातील बजाज नगर येथे आठवलेंची जाहीर सभा संपन्न झाली. यावेळी त्यांनी एकजुटीचं आवाहन केलं.
ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचं अध्यक्ष व्हावं. पक्षात मी कोणतंही पद घेण्यास तयार असेन असे सूतोवाच आठवलेंनी केले. ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या आणि माझ्याही पाठीशी मोठा समाज आहे. त्यांनी किंवा मी विभक्त राहून कार्य केले तर ऐक्याला अर्थ नाही. त्यामुळे आंबेडकरी चळवळ टिकवायची असेल आणि डाॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला भारत देश घडवायचा असेल तर समाजाच्या उन्नतीसाठी ऐक्य महत्वपूर्ण असल्याचं प्रतिपादन या पार पडलेल्या सभेत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केलं.