Ramdas Athawale Interview: मोदींना हसविणे सोपे नव्हते, ते केले; रामदास आठवलेंनी सांगितले भाजपाकडे कसा वळलो...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 10:17 AM2021-09-18T10:17:20+5:302021-09-18T10:29:20+5:30

Ramdas Athawale Interview Rajkarnachya Palikade: लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी रामदास आठवले यांची राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक मुलाखत घेतली. यावेळी रामदास आठवलेंनी आईच्या आठवणी सांगितल्या.

Ramdas Athavale told how they went with BJP, Sharad Pawar, Balasaheb Thackreay; his mother sacrifices | Ramdas Athawale Interview: मोदींना हसविणे सोपे नव्हते, ते केले; रामदास आठवलेंनी सांगितले भाजपाकडे कसा वळलो...

Ramdas Athawale Interview: मोदींना हसविणे सोपे नव्हते, ते केले; रामदास आठवलेंनी सांगितले भाजपाकडे कसा वळलो...

Next

माझं मन कवितेत, गावात, दिल्लीत असते. या देशातील गरीब माणसाला न्याय देण्यासाठी माझे मन असते. माझ्याकडे पाहिले तर लोकांना वाटते की हा नेता नाही. नरेंद्र मोदींना हसविणे सहजासहजी कोणाला जमलेले नाही. ते मी केले, असे सांगतानात केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी (Ramdas Athawale) त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से सांगितले आहेत. यावेळी त्यांनी त्याच्या आईने केलेले अपार कष्ट देखील नमूद केले. (Ramdas Athawale Interview  by Lokmat. telling mother's sacrifices.)

लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी रामदास आठवले यांची राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक मुलाखत घेतली. यावेळी रामदास आठवलेंनी आईच्या आठवणी सांगितल्या. माझी आई शेतमजूर म्हणून काम करायची. मी सहा महिन्यांचा असताना वडील नायगावमध्ये कामगार होते. लहानपणीच त्यांचे छत्र हरपले. त्यामुळे आजोळी मी वाढलो, शिकलो. तेथील शाळेत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरीत झालो. आई माझ्यासाठी शेतात राब राब राबली. आईने मला शिकविले नसते तर मी आज इथे पोहोचू शकलो नसतो. गूळ, आंबे मला खूप आवडायचे. पाटलाच्या शेतातून दोन-तीन ऊस तोडून आणायची. हॉस्टेलला असताना आई दररोज एसटीतून डबा पाठवायची. बस स्टॉपवर जाऊन तो डबा घ्यायचो. सकाळी उठून ती डबा बनवायची, अशा आठवणी आठवलेंनी जागवल्या. यावेळी ते काहीसे भावूक देखील झाले.  

बाबासाहेबांची चळवळ ही दलित आणि सवर्णांना वेगळे करणारी नव्हती, तर ती एकत्र आणणारी होती, असे आठवले म्हणाले. 

माझे मुंबईत घर नव्हते...
शरद पवारांनी मुख्यमंत्री असताना मला राज्यात मंत्री केले. तेव्हा मी सातपुडा बंगल्यावर आलो. सत्ता गेल्यानंतर मला मुंबईत रहायला घर नव्हते. 6000 रुपये भाडे देवून मी दुसरीकडे राहत होतो. मंत्री असताना मला एक जमीन मिळाली होती. तिथे मी घर बांधले आणि 2011 मध्ये तिथे रहायला गेलो, अशी आठवण रामदास आठवलेंनी सांगितली.  

भाजपाकडे कसा वळलो...
शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली तर काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका बसू शकतो, असे बाळासाहेब ठाकरेंनी सांगितले. मग मी राज्यभरातील लोकांशी संवाद साधला. बाळासाहेब ठाकरेंची बाजू मांडली. ठाकरेंबाबत कश्या अफवा पसरविल्या असे त्यांना सांगितले. त्यानंतर राजकारणात असे होऊ शकते, असा निर्णय घेऊन आम्ही युतीत आलो. आता भाजपासोबत आहे, असा खुलासा रामदास आठवलेंनी केला. 
 

Web Title: Ramdas Athavale told how they went with BJP, Sharad Pawar, Balasaheb Thackreay; his mother sacrifices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.