शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
3
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
4
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
5
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
6
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
7
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
8
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
9
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
10
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
11
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
12
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
13
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
14
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
15
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
16
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
17
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
18
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
19
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
20
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 

राम मंदिराचा मुद्दा जुनाच - रावसाहेब दानवे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2018 5:24 PM

नोटिफीकेशन

लातूर - जनतेला पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामावर विश्वास आहे. विकासामुळे जनतेला आणि पक्षालाही सध्या ‘अच्छे दिन’ आहेत. शिवसेनेने उपस्थित केलेला राम मंदिराचा मुद्दा जुना आहे. हा विषय निवडणुकीचा होऊ शकत नाही. परंतु, शिवसेनेचे हे धोरण असेल तर त्यांचे स्वागतच आहे, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी येथे रविवारी पत्रपरिषदेत व्यक्त केले.खा. दानवे म्हणाले, १९९२-९३ मध्ये भाजपाने राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी शिवसेना आमच्यासोबत होती. आताही समविचारी पक्षासोबत युती करण्याची भाजपची तयारी आहे. राम मंदिर हा विषय हिंदूंच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्याकरिता सरकार योग्य भूमिका घेईल. परंतु, सध्या भाजपाचा विकासाचा अजेंडा आहे. त्यामुळे राम मंदिराचा विषय निवडणुकीचा होऊ शकत नाही. शिवसेनेने हा मुद्दा उपस्थित केल्याने आमची काहीच अडचण होणार नाही. त्यांचे स्वागतच आहे. पत्रपरिषदेला पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, खा.डॉ. सुनील गायकवाड, आ. विनायकराव पाटील, जिल्हाध्यक्ष नागनाथअण्णा निडवदे, शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, गणेश हाके, माजी आ. गोविंद केंद्रे, रमेश कराड आदींची उपस्थिती होती. मराठा समाजाला घटनादत्त आरक्षण राज्य मागासवर्गीय आयोगाने मराठा समाज मागास असल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे आता या समाजाला स्वतंत्र १६ टक्के आरक्षण देण्यासाठी कसलीच अडचण येणार नाही. आयोगाने अहवाल दिल्याने आरक्षण आता घटनादत्त होईल. शिवाय, भारतीय जनता पार्टी असा एकमेव पक्ष आहे, या पक्षाने मराठा समाजाला इतर आरक्षणाला धक्का न लावता १६ टक्के आरक्षण देण्याचा ठराव केला असल्याचे खा. दानवे म्हणाले.विरोधकांच्या पोटात भीतीचा गोळा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विश्वासार्हता संपलेली आहे. भाजप देशात आणि राज्यात एक नंबरचा पक्ष आहे. त्यामुळे विरोधकांच्या पोटात आता भीतीचा गोळा उठला आहे. राज्य व केंद्र सरकारने जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणावरून ओबीसी व मराठा समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होतोय, असा आरोपही दानवे यांनी केला. वन बूथ.. २५ यूथ राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात आणि २८८ विधानसभा मतदारसंघांत वन बूथ २५ यूथ अशी बांधणी करण्यात आली आहे. बूथ प्रमुखांसह ९२ हजार यूथची बांधणी केली आहे. त्यापैकी ८३ हजार यूथचे प्रशिक्षण झाले आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी ४८ लोकसभा मतदारसंघांत भाजपचा दौरा सुरू आहे. लातूरचा चौथ्या टप्प्यातील दौरा आज होत असून, त्यानंतर हिंगोली, परभणी जिल्ह्याचा होणार असल्याचे खा. दानवे यांनी सांगितले.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेlaturलातूर