Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 08:34 IST2025-12-18T08:17:39+5:302025-12-18T08:34:23+5:30
Sculptor Ram V. Sutar Passes Away: ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे १०१ व्या वर्षी निधन झाले आहे.

Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
महापुरुषांच्या अजरामर शिल्पकृती साकारणारे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे निधन झाले. राम सुतार यांनी जगभरात २०० हून अधिक पुतळे बनवले आहेत. त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. जागतिक पातळीवर देशाचे नाव उंचावण्यात सुतार यांचा वाटा मोठा आहे. आज सकाळी ११ वाजता गुरुग्राममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
राम सुतार यांचा हुबेहूब, जिवंत पुतळे उभारणीत हातखंडा आहे. त्यांच्या शिल्पकृतीतील मानवीय भाव सूक्ष्म आणि बोलके संदेश पाहायला मिळतात. धुळे जिल्ह्यातील गोंदूर हे त्यांचे मूळ गाव असून राम सुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार आहेत. त्यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात १९ फेब्रुवारी १९२५ रोजी झाला. त्यांनी देशभरात अनेक ख्यातनाम शिल्पं उभारली आहेत. त्यामध्ये ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा सर्वांत उंच पुतळा उभारणीचे काम सुद्धा त्यांनी केले आहे.
अनेक देशांमध्ये त्यांनी बनवले पुतळे
राम सुतार यांनी मुंबईतील जेजे स्कूल ऑफ आर्टमधून शिक्षण पूर्ण केले. त्यांनी बनवलेल्या अनेक कलाकृती भारतात आणि जगात कौतुकाच्या ठरल्या आहेत. त्यांनी दिल्लीतील बनवेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे जगभरात कौतुक झाले. या पुतळ्याची फ्रान्स, अमेरिका, इटली, अर्जेंटिना, रशिया, इंग्लंड, मलेशिया, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, चीन, इजिप्त, पोलंड, दक्षिण आफ्रिका यासह अनेक ४५० हून अनेक शहरांमध्ये स्थापन केली आहे.
सुतार यांच्याकडून शिल्पकला शिकण्यासाठी जगभरातील कलाकारांनी त्यांच्या स्टुडिओवा भेट दिली. सुतार यांच्या 'राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड' आणि 'राम सुतार फाइन आर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड' या कंपन्यांची जगातील मोठ्या कंपन्यांमध्ये गणना केली जाते. त्यांचा स्टुडिओ उत्तर प्रदेशातील नोएडा येथे आहे.
सुतार यांची जगातील सर्वात मोठा पुतळा बनवण्याची इच्छा होती. गुजरातमधील सरदार सरोवर धरणावर स्टॅच्यू ऑफ युनिटी स्थापित झाल्यानंतर त्यांची ही इच्छा पूर्ण झाली. ५२२ फूट उंच पुतळा एवढा मोठा पुतळा जगातील एकमेव आहे.