शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे यांना ऐनवेळी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापनेचं निमंत्रण, काय निर्णय घेणार? राजकीय वर्तुळाचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 18:41 IST

Ram Mandir: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांना अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण अद्याप पाठवण्यात न आल्याने उलट सुलट चर्चा सुरू होती. दरम्यान, आज ऐनवेळी उद्धव ठाकरे यांना राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

अयोध्येतील राम मंदिरामध्ये होणाऱ्या रामललांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. या सोहळ्याचं निमंत्रण देशभारातील  अनेक मान्यवरांना पाठवण्यात आलं आहे. मात्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांना या सोहळ्याचं निमंत्रण अद्याप पाठवण्यात न आल्याने त्याची राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू होती. तसेच २२ तारखेला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोळ्या दिवशीच उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील काळाराम मंदिर येथे जाऊन पूजा आणि महाआरती करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. दरम्यान, आज ऐनवेळी उद्धव ठाकरे यांना राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

अयोध्येतील रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून उद्धव ठाकरे यांना हे निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. कुरिअरद्वारे उद्धव ठाकरे यांना हे निमंत्रण पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आता हे निमंत्रण स्वीकारून उद्धव ठाकरे आपला पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करून अयोध्येतील सोहळ्याला जाणार की, आपला कुणी प्रतिनिधी पाठवणार की, इंडिया आघाडीतील इतर मित्रपक्षांप्रमाणे हे निमंत्रण नाकारणार, याबाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. 

अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं विविध मान्यवरांसह सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. मात्र विरोधी पक्षाती बहुतांश नेत्यांनी हे निमंत्रण नाकारलं आहे. अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा त्यात शिवसेनेचा मोलाचा वाटा होता, असा दावा उद्धव ठाकरे नेहमी करत असतात. त्यामुळे आता त्या जागी राम मंदिर उभं राहून त्यात प्राणप्रतिष्ठापना होत असताना उद्धव ठाकरे उपस्थितीबाबत काय भूमिका घेणार यााबाबत उत्सुकता आहे.   

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याUddhav Thackerayउद्धव ठाकरे