'बेटी भगाओ'वाल्या राम कदमांची 'लोकमत'च्या वाचकांकडूनही धुलाई; बघा कसा केला हल्लाबोल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 20:32 IST2018-09-05T20:32:00+5:302018-09-05T20:32:52+5:30

'बेटी भगाओ'वाल्या राम कदमांची 'लोकमत'च्या वाचकांकडूनही धुलाई; बघा कसा केला हल्लाबोल!
भाजपचे सुसंस्कृत आमदार राम कदम यांनी दही हंडीवेळी मुलीला मुलगा पसंत नसला तरीही तिला पळवून आणण्याच्या दिलेल्या आश्वासनाविरोधात लोकमतने आपल्या वाचकांना व्यक्त होण्यास सांगितले होते. फेसबुकवर राम कदम यांच्याविरोधात वाचकांनी जाहीर निषेध करत जोरदार टीकाही केली. काही जणांनी या मुक्ताफळे उधळणाऱ्या कीर्तनकाराला पुढच्या निवडणुकीत पाडण्यासह त्याच्या या कृत्याबाबत चुप्पी साधलेल्या मुख्यमंत्र्यांवर शरसंधान साधले आहे. तर काहींनी घाटकोपरवासीयांवरही जबाबदारी सोपवली आहे...पाहा लोकमतच्या प्रश्नावर आलेल्या वाचकांच्या निवडक प्रतिक्रिया...
मुख्यमंत्री जबाबदार कसे?
भाजपवाले यालाही चोपणार का?