राळेगणसिद्धी ८० टक्के ‘स्मार्ट’
By Admin | Updated: January 1, 2017 03:08 IST2017-01-01T03:08:52+5:302017-01-01T03:08:52+5:30
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी हे गाव आदर्श ग्राम म्हणून ओळखले जाते. चाराबंदी, दारूबंदी, हुंडाबंदी यांसारख्या सामाजिक

राळेगणसिद्धी ८० टक्के ‘स्मार्ट’
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी हे गाव आदर्श ग्राम म्हणून ओळखले जाते. चाराबंदी,
दारूबंदी, हुंडाबंदी यांसारख्या सामाजिक उपक्रमांमुळे या गावाचा लौकीक सर्वदूर झाला आहे. तसे पाहिले तर हे गाव प्रगतीशील आहे. पंचक्रोशीतील पहिला फोन याच गावात आल्याने हे गाव तसे ‘कनेक्ट’ आहे. आता तर प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन आल्यामुळे आणि गावात इंटरनेटही पोहोचल्याने अण्णांचे राळेगणसिद्धी बरेचसे ‘स्मार्ट’ही बनले आहे. मात्र अद्याप पूर्णपणे ‘डिजिटल’ झालेले नाही. लहान मोठे व्यवहार अजुनही रोखीनेच होताना दिसत आहेत.
राळेगणसिद्धी
ता. पारनेर जि. अहमदनगर
जिल्ह्यापासून अंतर :
५५ किमी
लोकसंख्या : ३००० हजार
महाराष्ट्र बँक शाखा : एक
सहकारी बँक : नाही
पतसंस्था : एक
एटीएम : एक
पारनेर बसस्थानकातून
राळेगणसिद्धी बस आहेत.
गावात अंदाजे आठशे
ते नऊशे स्मार्ट फोन
साक्षरतेचे प्रमाण ९६ टक्के
सगळीकडे कॅशलेस आर्थिक व्यवहार सुरू झाल्यावर अनेक ठिकाणी भ्रष्टाचाराच्या प्रकारांना आळा बसेल. लोकांनीही आता डिजिटल माध्यामांचा वापर करून कॅशलेस व्यवहारांवर अधिक भर दिला पाहिजे.
- अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक
अद्याप सामान्य लोकांना डिजिटल व्यवहारांचे तंत्र अवगत झालेले नाही. परंतु मोबाइल वापरतात त्यांना डिजिटलचा सर्वाधिक फायदा होईल. खिशात रोख रक्कम नसली तरी फक्त डेबिट कार्ड असले तरी व्यवहार करू शकेल.
- दादा पठारे, उपाध्यक्ष,
आदर्श पतसंस्था
कॅशलेस व्यवहारांमुळे सर्वांत महत्त्वाचे म्हणजे लोकांचा पैसे काढण्यासाठी व भरणा किंवा इतर व्यवहारांसाठी दुसऱ्या गावांना जाण्याचा वेळ वाचेल. आर्थिक उलाढाल यंत्रणा प्रगत होईल. जुन्या लोकांना याचा थोडा त्रास होईल, पण नव्या पिढीसाठी हा निर्णय चांगला आहे.
- मंगल मापारी, सरपंच
कॅशलेस व्यवहारांमुळे चोरीचे प्रमाण कमी होईल. सामान्य माणूस बँकिंग प्रक्रियेत येऊन बँकिंग व्यवहारात सज्ञान होईल हा सर्वात मोठा फायदा आहे.
- भागवत पठारे, उद्योजक
पारनेरसारख्या ग्रामीण भागातही दोन हजारांच्या बनावट नोटा काहींनी तयार केल्या होत्या. या नोटांचा फटका सामान्य व्यापाऱ्यांनाच बसत होता. आता कॅशलेस व्यवहारांमुळे सामान्य लोकांची फसवणूक थांबणार आहे.
- संजय पठाडे,
शिक्षक