राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच! शरद पवारांनी 'सिल्व्हर ओक'वरूनच भरला राज्यसभेचा अर्ज; वाचा नेमकं काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 05:14 IST2026-03-06T05:14:11+5:302026-03-06T05:14:24+5:30

Sharad Pawar Rajya Sabha Nomination: शरद पवार यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे घरूनच भरला राज्यसभेचा उमेदवारी अर्ज. निवडणूक आयोगाच्या विशेष परवानगीने पार पडली प्रक्रिया. वाचा, सर्वोच्च न्यायालयाचा कोणता नियम पवारांच्या मदतीला आला.

Rajyasabha Election 2026: Sharad Pawar filled the application form from home; First incident in the state | राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच! शरद पवारांनी 'सिल्व्हर ओक'वरूनच भरला राज्यसभेचा अर्ज; वाचा नेमकं काय आहे कारण?

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच! शरद पवारांनी 'सिल्व्हर ओक'वरूनच भरला राज्यसभेचा अर्ज; वाचा नेमकं काय आहे कारण?

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यसभा निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज त्यांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावरच भरला. त्यासाठीची रीतसर परवानगी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना दिलेली होती.

पवार यांना नुकताच इस्पितळातून डिस्चार्ज मिळाला होता. गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता, पण विधानभवनात येऊन अर्ज भरण्याची शारीरिक स्थिती नाही, डॉक्टरांनीदेखील आपल्याला त्या बाबत सल्ला दिला आहे. त्यामुळे व्यक्तिश: अर्ज भरायला येता येणार नाही, असे पवार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विलास आठवले यांना कळविले. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार...
आठवले यांनी सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल आणि त्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेले आदेश यांचा संदर्भ घेत पवार यांना घरूनच अर्ज भरण्याची परवानगी दिली. त्यानुसार अधिकारी घरी गेले आणि अर्ज स्वीकारला.

अशी असते शपथ
अर्ज सादर करत असताना उमेदवाराने एक शपथही घ्यायची असते. ‘मी राज्यसभेतील जागा भरण्यासाठी उमेदवार म्हणून नामनिर्देशित झालो असल्याने ईश्वरसाक्ष शपथ घेतो की/ गांभीर्याने प्रतिज्ञा करतो की, कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधाननाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन आाणि भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन’ असा या शपथपत्रातील मजकूर असतो.

मी शरदचंद्र गोविंदराव पवार
पशुपतीनाथसिंग विरुद्ध हरिहरप्रसाद सिंह या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिला होता की, विशिष्ट कारणाने उमेदवारास अर्ज भरण्यास जाणे शक्य नसेल तरीही ते घरून, इस्पितळातून वा तुरुंगातून अर्ज सादर करू शकतील.
उमेदवाराने अशावेळी कोणती शपथ घ्यायची 
याचा नमुना हा संविधानाच्या कलम ८४ (अ) च्या तिसऱ्या शेड्युलमध्ये दिलेला आहे. त्यानुसार सक्षम अधिकाऱ्यासमोर शरद पवार यांनी शपथ घेतली आणि अर्ज सादर केला. राज्याच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.
शरद पवार  यांचा अर्ज त्यांच्या आमदारांनी भरला. तासगावचे रोहित पाटील हे सूचक होते. यावेळी विधिमंडळात उद्धवसेनेचे भास्कर जाधव,काँग्रेसचे सतेज पाटील,राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे  यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते.मात्र, चर्चा होती ती आदित्य ठाकरे यांच्या अनुपस्थितीची.

Web Title : शरद पवार ने स्वास्थ्य कारणों से घर से राज्यसभा नामांकन दाखिल किया।

Web Summary : स्वास्थ्य संबंधी चिंताओं के कारण, शरद पवार ने अपना राज्यसभा नामांकन अपने आवास 'सिल्वर ओक' से दाखिल किया, जो राज्य के इतिहास में पहली बार हुआ। चुनाव अधिकारियों ने सर्वोच्च न्यायालय के निर्देशों के आधार पर अनुमति दी, जिससे उन्हें घर पर शपथ लेने की अनुमति मिली।

Web Title : Sharad Pawar files Rajya Sabha nomination from home due to health.

Web Summary : Due to health concerns, Sharad Pawar filed his Rajya Sabha nomination from his residence, 'Silver Oak,' a first in the state's history. Election officials granted permission based on Supreme Court directives, allowing him to take the oath at home.