शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Rajya sabha Election 2022: '...म्हणून शिवसेनेच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं'; संजय राऊतांनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 12:08 IST

Rajyasabha Election 2022: शिवसेनेचा आपल्या आमदारांवर विश्वास नाही का, असा सवाल भाजपकडून विचारला जात आहे. त्यावर संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.

मुंबई: सध्या राज्यात राज्यसभा निवडणुकीची (Rajya Sabha Election 2022) रणधुमाळी सुरू आहे. महाविकास आघाडी सरकार तीन तर भाजप दोन जागांवर सहज विजय मिळवू शकतात. पण, सहाव्या जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे. यात काही दगाफटका होऊ नये म्हणून शिवसेनेने आपल्या आमदारांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवले आहे. शिवसेनेचा आपल्या आमदारांवर विश्वास नाही का, असा सवाल भाजपकडून विचारला जात आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महत्वाची माहिती दिली. 

'राज्यसभेचे मतदान किचकट'राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये थेट लढत होत आहे. या निवडणुकीत आमदार फुटू नयेत, याची प्रत्येक पक्ष काळजी घेत आहे. दरम्यान, शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना हॉटेलमध्ये का ठेवले, याबाबत संजय राऊत यांनी माहिती दिली. 'राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीची प्रक्रिया ही तांत्रिक आणि किचकट असते. हे मतदान नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने असते. त्याबाबत आमदारांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. त्यामुळेच आम्ही शिवसेनेच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले आहे,' असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले. 

'आमचे सर्व उमेदवार निवडून येणार'यावेळी संजय राऊतांनी भाजपवर जोरदार टीका केली. 'फक्त आम्हीच नाही तर भाजप आणि काँग्रेसच्या आमदारांनाही हॉटेलवर ठेवण्यात आले आहे. मग फक्त शिवसेनेच्याबाबतीच प्रश्नचिन्ह का उपस्थित केले जात आहे? तुमचं ते गेटटुगेदर आणि आमच्याबाबतीत लगेच प्रश्न उपस्थित केले जातात. मी खात्रीने सांगतो की, महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील. 10 जून रोजी रात्री आठ वाजेपर्यंत निकाल स्पष्ट झालेला असेल', असेही राऊत यांनी म्हटले.

शिवसेनेच्या आमदारांना ट्रायडंट हॉटेलमध्ये हलवणारवर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर शिवसेनेच्या आमदारांना सोमवारी रात्री मार्वे बीचवरील 'द रिट्रीट' हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. या आमदारांना मंगळवारी दुपारी विधानभवनापासून काही अंतरावर असलेल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये हलवण्यात येईल. शिवसेनेच्या जवळपास २५ आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. राज्यसभा निवडणुकीत कोणताही दगाफटका टाळण्यासाठी शिवसेनेकडून हे पाऊल उचलण्याची आल्याची चर्चा आहे.

असे आहे मतांचे गणितशिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे मिळून 26 अतिरिक्त मतं आहेत. मात्र उर्वरित 16 मतांसाठी त्यांना महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे अपक्ष, छोटे पक्ष आणि इतरांच्या पाठिंब्याची गरज आहे. तर भाजपाकडे स्वत:ची 22 अतिरिक्त मतं असून, अन्य 7 आमदारांचा पाठिंबा धरता एकूण 29 मते आहेत. उर्वरित 13 मतांसाठी भाजपाचा महाविकास आघाडीचे मित्र असलेले छोटे पक्ष आणि अपक्षांवर डोळा आहे.  

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस