लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे एकमत आणि भाजपचे सहकार्य यातून ज्येष्ठ नेते शरद पवार हे पुन्हा राज्यसभेवर जाणार असल्याचे चित्र बुधवारी स्पष्ट झाले. राज्यातील राज्यसभेच्या सातही जागांची निवडणूक बिनविरोध होणार हेही निश्चित झाले.
काँग्रेस आणि उद्धवसेना या दोन्ही मित्र पक्षांनी शरद पवार यांच्या राज्यसभा उमेदवारीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याने तसेच भाजपने पाचवा उमेदवार न दिल्याने सात जागांसाठी प्रमुख सात उमेदवार रिंगणात असतील. त्यामुळे वयाच्या ८५ व्या वर्षी पुन्हा राज्यसभेवर जाणार आहेत. या निमित्ताने साठ वर्षांच्या त्यांच्या सांसदीय कारकिर्दीला आणखी सहा वर्षांची जोड मिळणार आहे.
पवार यांच्या नावावर मविआचे एकमत झाले तर भाजप पाचवा उमेदवार मैदानात उतरविणार नाही अशी अटकळ राजकीय वर्तुळात बांधली जात होती, ती खरी ठरली. उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या (गुरुवार) शेवटचा दिवस असून सर्व उमेदवार हे उद्याच अर्ज भरणार आहेत.
तावडे, आठवले, वडकुते, इवनातेंना भाजपची संधीकेंद्रीय भाजपने महाराष्ट्रातून पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना संधी देतानाच माजी आमदार रामराव वडकुते व नागपूरच्या माजी महापौर माया इवनाते यांनाही उमेदवारी दिली. तावडे, आठवलेंना संधी देत अन्य दोन नावांबाबत केंद्रीय नेतृत्वाने धक्कातंत्राचा अवलंब केला. शिंदेंकडून शेवाळे की?शिंदेसेनेने उमेदवार घोषित केलेला नाही. माजी खासदार राहुल शेवाळे यांचे नाव आघाडीवर असले तरी एकनाथ शिंदे गुरुवारी उमेदवार जाहीर करतील. आजोबा-नातू राज्यसभेवरज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांचे नातू व अजित पवार-सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे आजोबा-नातू एकाचवेळी राज्यसभेवर जाणार आहेत. पार्थ यांना राष्ट्रवादीने (अजित पवार गट) आधीच उमेदवारी जाहीर केली आहे.
विलीनीकरणाबाबतची अट मान्य अन् पाठिंबाअजित पवार गटात विलिन न होण्याची भूमिका स्पष्ट करा मगच शरद पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा देऊ, अशी अट काँग्रेस आणि उद्धवसेनेने घातलेली होती. ती शरद पवार गटाने मान्य केल्यानंतरच पाठिंबा देण्यात आला. विलीनीकरणाचा मुद्दा आता संपलेला आहे असे या पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी पत्रकारांनाही सांगितले.
Web Summary : Sharad Pawar is set to return to the Rajya Sabha unopposed, thanks to consensus within the Maha Vikas Aghadi and cooperation from the BJP. Other candidates include Vinod Tawde and Ramdas Athawale. Ajit Pawar's son, Parth Pawar, is also nominated. Merger conditions were accepted for support.
Web Summary : शरद पवार निर्विरोध राज्यसभा में लौटने के लिए तैयार हैं, यह महा विकास अघाड़ी के भीतर आम सहमति और भाजपा के सहयोग के कारण संभव हो पाया है। अन्य उम्मीदवारों में विनोद तावड़े और रामदास अठावले शामिल हैं। अजित पवार के बेटे, पार्थ पवार भी नामित हैं। समर्थन के लिए विलय की शर्तें स्वीकार की गईं।