शहरं
Join us  
Trending Stories
1
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
2
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
3
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
4
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
5
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
6
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
7
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
8
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
9
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
10
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
11
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
12
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
13
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
14
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
15
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
16
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
17
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
18
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
19
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
20
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT

अपक्ष, लहान पक्षांनी वाढविले टेन्शन; महाविकास आघाडी, भाजपला चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 06:54 IST

Rajya Sabha Election 2022: राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे ते स्वत: आणि राजकुमार पटेल हे दोन आमदार आहेत. आम्ही महाविकास आघाडीसोबतच राहू, असे कडू यांनी म्हटले आहे.

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आणि लहान पक्षांचे आमदार कोणाला मतदान करणार याबाबत उत्सुकता आहे. त्यांनी भूमिका जाहीर न केल्याने महाविकास आघाड व भाजपचेही टेन्शन वाढले. लहान पक्षांत सर्वाधिक आमदार बहुजन विकास आघाडीचे आहेत. त्यांचे नेते हितेंद्र ठाकूर कोणासोबत जातात हे महत्त्वाचे आहे. 

ठाकूर यांनी अद्याप पत्ते उघडलेले नाहीत. ते भाजपसोबत जाणार अशी चर्चा आहे. मात्र, त्यांनी स्वत: अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही. त्यांनी सांगितले की, त्यांना कोणत्याही पक्षाची ॲलर्जी नाही. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे ते स्वत: आणि राजकुमार पटेल हे दोन आमदार आहेत. आम्ही महाविकास आघाडीसोबतच राहू, असे कडू यांनी म्हटले आहे. 

आघाडी सरकारला पाठिंबा देणाऱ्या समाजवादी पक्षाचे आ. अबू आझमी यांनी सांगितले की, सरकारने मुस्लिमांना आरक्षण दिले नाही, त्यांच्या कल्याणाच्या योजना राबविल्या नाहीत. 

घोडेबाजार शब्दावर आक्षेप

- शिवेसेनेचे काही बडे नेते हे अपक्ष, लहान पक्षांसाठी भाजपकडून घोडेबाजार सुरू असल्याचे सांगत सुटले आहेत. अपक्ष आमदारांसाठी घोडेबाजार असा शब्द त्यांनी वापरू नये. नाहीतर वेगळा विचार करावा लागेल, असे चंद्रपूरचे अपक्ष आ. किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. 

- हा शब्द वापरल्याने अपक्षांची प्रतिमा मलिन होते, असा आक्षेप त्यांनी घेतला. मीरा भाईंदरच्या आ. गीता जैन यांची भूमिका योग्य असून, कोणत्याही पक्षाच्या नेत्याने घोडेबाजार हा शब्द वापरणे निषेधार्हच आहे, अशी भावना ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

- मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी, अजित पवार आणि माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख हे त्यांचे नेते असल्याचे व त्यांचा शब्द आपल्यासाठी प्रमाण असल्याचे सांगत महाविकास आघाडीसोबत राहू, असे स्पष्ट संकेत दिले. 

- चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी ते सद्सद्विवेक बुद्धीने मतदान करतील, असे सांगत गूढ वाढविले आहे. 

- बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा हे भाजपसोबत जातील. रवी राणा हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जातात. 

- राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार आहेत. मनसे कोणासोबत जाणार हे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी अद्याप जाहीर केलेले नाही. 

- मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन  अपक्ष म्हणून विजयी झाल्या होत्या. नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मी सेनेसोबतच राहणार, असे त्या म्हणाल्या.

आमचे नेते खा. असदुद्दीन ओवेसी हे ६ जूनला मुंबईत आहेत. त्यावेळी बैठकीत ओवेसी यांच्या आदेशानुसार राज्यसभा निवडणुकीसाठीची आमची भूमिका निश्चित केली जाईल.     -इम्तियाज जलिल,     खासदार, औरंगाबाद.

माझ्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांशी बोलून मी येत्या दोन-तीन दिवसांत निर्णय घेईन. तत्पूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांशीदेखील चर्चा करेन.         - विनोद निकोले,     डहाणूचे माकप आमदार.

 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूकMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र