शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

Rajya Sabha Election: अपक्ष आमदार ठरवणार सहावा खासदार; कुणाची विकेट काढणार?... वाचा, कसं होईल मतदान

By यदू जोशी | Updated: May 30, 2022 17:10 IST

भाजपाचे दोन आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा एकेक उमेदवार पहिल्या पसंतीच्या ४२ मतांचा कोटा मिळवून सहज जिंकतील. सातपैकी विकेट कोणाची पडेल? महाडिकांची की संजय पवारांची की आणखी कोणाची?

>> यदु जोशी

मुंबई - राज्यसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होणार हे नक्की दिसत आहे. कारण, महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर निवडून द्यावयाचे आहेत सहा खासदार आणि उमेदवार आहेत सात. याचा अर्थ चुरस होणार हे नक्की. भाजपने तीन, शिवसेनेने दोन, राष्ट्रवादीने एक आणि काँग्रेसने एक उमेदवार दिला आहे. सहाव्या जागेसाठी घमासान होईल. घोडेबाजाराला ऊत येऊ शकतो. 

भाजपने केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि राज्यातील माजी मंत्री डॉ.अनिल बोंडे यांच्यासोबतच धनंजय महाडिकांच्या रुपाने तिसरा उमेदवार दिला आहे. शिवेसनेचे संजय राऊत आणि संजय पवार, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसने उत्तर प्रदेशातून आणून संधी दिलेले इम्रान प्रतापगडी या सात उमेदवारांपैकी सहा जिंकतील, एकाला घरी बसावे लागेल. सातपैकी विकेट कोणाची पडेल? महाडिकांची की संजय पवारांची की आणखी कोणाची? भाजपाचे दोन आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा एकेक उमेदवार पहिल्या पसंतीच्या ४२ मतांचा कोटा मिळवून सहज जिंकतील. 

महाविकास आघाडीची १० मते फुटणार?; भाजप उमेदवार धनंजय महाडिकांचा खळबळजनक दावा

राज्यसभेची ही निवडणूक गुप्त मतदानाने होत नाही.  प्रत्येक पक्षाच्या आमदाराला त्याच्या पक्षाच्या प्रतिनिधीला आधी मत दाखवावे लागते आणि नंतरच ते मतपेटीत टाकावे लागते. पक्षाने ज्या उमेदवाराला मत द्या म्हणून व्हिप जारी केलेला असतो त्याच उमेदवाराला मतदान करावे लागते आणि तसे केले नाही तर तुमची आमदारकी जाऊ शकते. मग या निवडणुकीत घोडेबाजाराला संधी आहे कुठे? तर ती आहे अपक्ष आमदारांच्याबाबत. राज्यातील सर्व अपक्ष आमदार हे कोणत्या ना कोणत्या पक्षाचे सहयोगी सदस्य आहेत. मात्र, आपल्या सहयोगी पक्षाच्या प्रतिनिधीला मत दाखविण्याचे बंधन त्यांच्यावर नाही. उलटपक्षी अपक्ष आमदाराने मत दाखवू नये, असा नियम असल्याचे सांगितले जाते. इथेच घोडेबाजाराला संधी आहे.

“रोहित पवार आमचा पक्ष फोडतायत, शरद पवारांकडे तक्रार करेन”; शिवसेना नेत्याचा इशाराभाजपच्या श्रेष्ठींनी महाराष्ट्रात तिसरा उमेदवार देताना तो निवडून येण्याची 'सोय' करूनच दिला असेल असे म्हटले जात आहे. तसे असेल तर, शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार हे अडचणीत येऊ शकतात. आ.हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी, समाजवादी पार्टी, शेकाप, एमआयएम, कम्युनिस्ट, मनसे हे लहान पक्ष आणि अपक्ष काय करतील यावर सहाव्या जागेचा निकाल अवलंबून असेल. केवळ पक्षीय बलाबलाचा विचार केला तर भाजपकडे दोन जागा जिंकून सर्वाधिक अतिरिक्त मते आहेत. त्या खालोखाल शिवसेनेकडे व नंतर राष्ट्रवादीकडे अतिरिक्त मते आहेत. काँग्रेसकडे केवळ दोन अतिरिक्त मते आहेत. भाजपचे पीयूष गोयल, डॉ.अनिल बोंडे, शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे  प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान  प्रतापगडी यांना कोणताही धोका दिसत नाही. भाजपचे धनंजय महाडिक की शिवसेनेचे संजय पवार हा या निवडणुकीतील औत्सुक्याचा बिंदू आहे.

राज्यातून राज्यसभेसाठी रिंगणात कोण कोण? 

भाजप : पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक काँग्रेस : इम्रान प्रतापगढीराष्ट्रवादी : प्रफुल्ल पटेलशिवसेना : संजय राऊत आणि संजय पवार

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस