शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

"महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यातील सव्वादोन कोटी ग्राहकांची चालवली चेष्टा", राजू शेट्टींचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 10:55 IST

Raju Shetty AndThackeray Government : केरळ, मध्य प्रदेश व गुजरात या राज्यांनी घरगुती वीज बिलांमध्ये सहा महिन्यांसाठी ५० टक्के सवलत दिली आहे. 

कोल्हापूर - लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिले माफ करावीत, या मागणीसाठी शुक्रवारी (दि. १९) राज्यभर महामार्ग रोको करण्यात येणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. अधिवेशनाच्या सुरुवातीला वीज कनेक्शन तोडणीस स्थगिती द्यायची आणि शेवटच्या दिवशी उठवायची, हा विधिमंडळाचा अवमान आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यातील सव्वादोन कोटी ग्राहकांची चेष्टा चालविल्याचा आरोपही त्यांनी केला. 

लॉकडाऊनच्या काळातील सहा महिन्यांची घरगुती वीज बिले माफ करावीत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना,  शिवसेना, ‘माकप’, ‘शेकाप’ , जनता दल, जनसुराज्य’ आदी पक्ष व संघटनांनी गेले दोन-तीन महिने आंदोलन सुरू केले आहे. केरळ, मध्य प्रदेश व गुजरात या राज्यांनी घरगुती वीज बिलांमध्ये सहा महिन्यांसाठी ५० टक्के सवलत दिली आहे. 

कर्नाटक सरकारने रिक्षाचालक, टॅक्सीचालक, फळभाजी विक्रेते, बांधकाम व यंत्रमाग कामगार घटकांना रोख मदत दिली आहे. मात्र महाराष्ट्र सरकारने काहीच केलेले नाही, ही बाब खेदजनक असून सरकारला जागे करायचे आहे.  १९ मार्च रोजी यवतमाळ येथील साहेबराव करपे या पहिल्या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती, त्याच दिवशी राज्यभर आंदोलनाचा वणवा पेटणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. यावेळी,  प्रताप होगाडे, बाबासाहेब पाटील-भुयेकर, विक्रांत पाटील-किणीकर, उदय नारकर, संदीप देसाई, संभाजीराव जगदाळे, समीर पाटील, शिवाजी माने, शरद पाटील, आदी उपस्थित होते.  

बुधवारी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत चर्चा 

वीज बिलाप्रश्नी बुधवारी (दि. १७) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सर्वपक्षियांना घेऊन चर्चा करणार असल्याचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितले. मुख्यमंत्री यावर निश्चितच तोडगा काढतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीMaharashtraमहाराष्ट्रkolhapurकोल्हापूरelectricityवीजUddhav Thackerayउद्धव ठाकरे