शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

टेकडावर जन्मलेल्या नटीनं शेतीवर बोलावं यापेक्षा मोठा विनोद कोणता?; शेट्टींचा कंगनावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 17:43 IST

शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणाऱ्या नट-नटींना शेतकऱ्यांची पोरं सडेतोड उत्तर देतील; राजू शेट्टींचा इशारा

इचलकरंजी: मोदी सरकारनं लोकसभेत राज्यसभेतही शेतीशी संबंधित विधेयकं मंजूर घेतली. या विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. या शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौतचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी खरपूस समाचार घेतला आहे. ''कंगनासारख्या नटवीनं शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणं यापेक्षा दुसरा विनोद नाही. शेतकऱ्यांवर टीका करणाऱ्या नट-नटींना शेतकऱ्यांची पोरं सडेतोड उत्तरं देतील,” अशा शब्दांत राजू शेट्टी यांनी कंगनावर जोरदार टीका केली आहे. "देश सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांना भाजपसमर्थक मोदीभक्त 'नटी'ने आतंकवादी ठरविले"प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना राजू शेट्टींनी कंगनावर हल्लाबोल केला. 'पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणातला शेतकरी त्यांच्या न्याय हक्कासाठी मोठ्या ताकदीने रस्त्यावर उतरला आहे. सरकारने मान्य केलेला हमीभाव मिळणं हा शेतकऱ्याचा घटनादत्त हक्क आहे. केंद्र सरकारनं नव्यानं आणलेल्या कृषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांच्या त्या हक्कावर गदा आली आहे. त्यांच्या आशा आकांक्षांना सुरूंग लागला आहे. अशा स्थितीत शेतकरी आपला आक्रोश घेऊन रस्त्यावर उतरत असताना कंगना रनौतसारख्या नटवीनं शेतकऱ्याला दहशतवादी म्हणणं यापेक्षा दुसरा विनोद नाही,' असं शेट्टी म्हणाले.ड्रग्ज प्रकरणात दीपिका पादुकोणचे नाव येताच कंगनाने साधला निशाणा; म्हणाली, रिपीट आफ्टर मी...! शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यावर हिमाचल प्रदेशसारख्या एका उंच टेकडावर जन्माला आलेल्या नटीने बोलणं यापेक्षा मोठा विनोद काय असू शकतो?, असा टोला शेट्टी यांनी लगावला. 'कंगनाला पुढे करणाऱ्यांना शिखंडी म्हणावं की काय म्हणावं यासाठी मला शब्द सुचत नाही. शेतकरी त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत असताना या नट-नट्या जर त्यांचा अपमान करत असतील, तर तुमच्याकडे पाशवी बहुमत असलं तरी याच शेतकऱ्यांची मुलं हातात दगड घेऊन रस्त्यावर उतरतील. त्या दगडांपुढे तुमच्या काचा टिकणार नाहीत. तुमचे काचेचे मनोरे क्षणात उद्ध्वस्त होतील आणि हा दिवस फार लांब नाही,' असा स्पष्ट इशारा शेट्टींनी दिला. 

कंगना रणौतवर भडकल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या - सुशांत मृत्यू केसचा मुद्दाच भरकटवला....'देशभरातील २६० पेक्षा अधिक संघटनांना एकत्र करून आम्ही अखिल भारतीय किसान संघर्ष समितीची स्थापना केली आहे. मागील दोन वर्षांपासून या झेंड्याखाली आम्ही सर्व शेतकरी नेते एकत्रितरित्या काम करत आहोत. यातून देशपातळीवर शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरवून एक दबाव गट तयार करत आहोत. यातूनच संपूर्ण देशभरातील शेतकरी सरकारच्या विरोधात उभा राहिला आहे. त्यांना केंद्र सरकारने पाशवी बहुमताच्या बळावर मंजूर केलेले कायदे मान्य नाहीत,' असं शेट्टी म्हणाले. 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीKangana Ranautकंगना राणौतFarmerशेतकरी