kangana ranaut slams deepika padukone for alleged involvement in drug nexus | ड्रग्ज प्रकरणात दीपिका पादुकोणचे नाव येताच कंगनाने साधला निशाणा; म्हणाली, रिपीट आफ्टर मी...! 

ड्रग्ज प्रकरणात दीपिका पादुकोणचे नाव येताच कंगनाने साधला निशाणा; म्हणाली, रिपीट आफ्टर मी...! 

ठळक मुद्देसुशांत सिंग राजपूतची टॅलेंट मॅनेजर जया शाहच्या एका कथित चॅट मध्ये ‘डी’ आणि ‘के’ या इंग्रजी आद्याक्षरांचा उल्लेख आहे.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला अटक झाल्यानंतर या प्रकरणात बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांची नावे समोर येत आहेत. सारा अली खान, रकुलप्रीत सिंग आणि श्रद्धा कपूर यांच्यापाठोपाठ या प्रकरणात आता बॉलिवूडची टॉप अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचे नाव पुढे आले आहे. अशात कंगना राणौत दीपिकाला लक्ष्य करण्याची संधी कशी गमावायची? दीपिकाचे नाव न घेता कंगनाने तिच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
ड्रग्ज प्रकरणात दीपिका पादुकोणचे नाव समोर येताच कंगनाने ट्विट केले.

रिपीट आफ्टर मी...

काही दिवसांपूर्वी दीपिकाने डिप्रेशनसंदर्भात ‘रिपीट आफ्टर मी’ नावाची एक पोस्ट केली होती. सोशल मीडियावर तिच्या या पोस्टची बरीच चर्चा रंगली होती. दीपिकाच्या या पोस्टचा आधार घेत कंगनाने तिला जोरदार टोला लगावला.

‘रिपीट आफ्टर मी, ड्रग्ज सेवनाचा परिणाम आहे डिप्रेशन. तथाकथित उच्चभू्र स्टार्सची मुले जे क्लासी  आणि संस्कारी दावा करतात, ते आपल्या मॅनेजरला विचारतात, माल है क्या?’, असे ट्विट कंगनाने केले आहे. आपल्या या ट्विटमध्ये तिने दीपिकाच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. पण तिचा इशारा दीपिकाकडेच आहे, हे स्पष्ट आहे.

कंगना इथेच थांबली नाही तर तिने आणखी एक ट्विट केले. ‘नार्कोटेररिजम, ज्या माध्यमातून शेजारी देशांतील काही स्वार्थी लोकांद्वारे आपल्या युवा पिढीला उद्धवस्त केले जात आहे. आज आपल्या समोर हे सुद्धा एक मोठे आव्हान आहे. काय आपण यावर विचार करणार आहोत?,’ असे तिने या ट्विटमध्ये लिहिले आहे.

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन: दीपिका पादुकोणला NCB समन्स बजावणार

डिप्रेशनचा धंदा करणाऱ्यांना जनतेनं दाखवली 'औकात', कंगना रानौतने दीपिका पादुकोणवर साधला निशाणा

असा झाला दीपिकाच्या नावाचा खुलासा

आज तकने एनसीबीच्या अधिका-यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सुशांत सिंग राजपूतची टॅलेंट मॅनेजर जया शाहच्या एका कथित चॅट मध्ये ‘डी’ आणि ‘के’ या इंग्रजी आद्याक्षरांचा उल्लेख आहे. एनसीबीच्या सुत्रांच्या माहितीनुसार डी’चा अर्थ दीपिका पादुकोण आणि ‘के’चा अर्थ करिश्मा (जया शाहची सहकारी).
एनसीबीच्या ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीत डी, एन, एस, के अशी नावे समोर आली आहे. यात डीचा अर्थ दीपिका पादुकोण, एन म्हणजे नम्रता शिरोडकर, एस म्हणजे श्रद्धा कपूर आणि के म्हणजे करिश्मा यांची नावे समोर आली आहेत. एनसीबीच्या हाती काही व्हाट्सअ‍ॅप चॅट लागले आहेत. यात दीपिका व करिश्मा ड्रग्जबद्दल बोलत आहेत. तुझ्याजवळ माल आहे का? असे दीपिका यात करिश्माला विचारते. यावर हो, पण घरी आहे. मी सध्या वांद्रयात आहे, असे उत्तर करिश्मा देते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kangana ranaut slams deepika padukone for alleged involvement in drug nexus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.