NCB to summon Deepika Padukone this week in Bollywood drug probe | बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन: दीपिका पादुकोणला NCB समन्स बजावणार

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन: दीपिका पादुकोणला NCB समन्स बजावणार

गेल्या काही दिवसांपासून सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. सुशांत सिंग मृत्यू प्रकरणाशी अनेकांचे धागेदोर जुळलेले असल्याचं हळूहळू उघड होऊ लागलं आहे. आता सुशांत सिंग राजपूत प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो दीपिका पादूकोणला समन्स बजावण्याच्या तयारीत  आहे.

सुशांतसिंग राजपूत मृत्यूच्या चौकशीतून पुढे आलेल्या ड्रग्ज प्रकरणात `बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचं नाव पुढे येत आहे. त्याच प्रकरणी आता एनसीबी दीपिकाला चौकशीसाठी बोलावणार आहे. टीव्ही रिपोर्टनुसार, नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या तपासणीत काही धागेदोरे मिळाले आहेत. ड्रग्ज चॅटमध्ये 'डी' आणि 'के'ची अद्याक्षरे असलेल्या व्यक्तींचा उल्लेख होता. डी याची ओळख दीपिका पादुकोण अशी झाली आहे, तर 'के' करिश्मा जी KWAN टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सी कर्मचारी आहे.

दीपिका आणि करिश्मा यांची उद्या एजन्सीमार्फत चौकशी केली जाऊ शकते, असेही या अहवालात म्हटले आहे. श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांनासुद्धा एनसीबी चौकशीला बोलावण्याची शक्यता आहे, असेही चॅनेलने नमूद केले आहे. सारा आणि श्रद्धा सुशांत सिंग राजपतूबरोबर पुण्याजवळील एका ठिकाणी अनेक वेळा गेल्याची माहिती ड्रग्ज कायदा अंमलबजावणी संस्थेला मिळाल्याचे एनसीबीच्या एका सूत्रानं स्पष्ट केले आहे. यापूर्वी सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि सायमन खंबाट्टा यांनी मादक पदार्थांचे सेवन केल्याची कबुली एनसीबीच्या चौकशीत रिया चक्रवर्तीनं दिली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: NCB to summon Deepika Padukone this week in Bollywood drug probe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.