CoronaVirus Update: रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी; राजेश टोपेंची केंद्राकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 19:27 IST2021-04-17T19:26:40+5:302021-04-17T19:27:52+5:30
CoronaVirus Update: कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशातील सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला.

CoronaVirus Update: रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी; राजेश टोपेंची केंद्राकडे मागणी
मुंबई: गेल्या सलग तीन दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या २ लाखांवर पोहोचली आहे. देशभरातील परिस्थिती गंभीर आणि भीतीदायक होत चालली आहे. कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढल्याने रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस यांची कमतरता जाणवू लागली असून, बेड्स आणि ऑक्सिजन यांची व्यवस्था अपुरी पडू लागली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ऑक्सिजनची मागणी आणि त्याची उपलब्धता पाहता अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्राला केली आहे. (rajesh tope demands that oxygen transport should be allowed through railway)
कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशातील सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ऑक्सिजन आणि रेमडेसीवीरचा तुटवडा, लसीकरण, विषाणूचा बदलता गुणधर्म याबाबत चर्चा केली. कोरोना विषाणुची जनुकीय संरचना बदलली का, याच्या तपासणीसाठी महाराष्ट्रातील काही नमुने पाठविण्यात आले आहे. त्यातील ११०० पैकी ५०० नमुन्यांची तपासणी झाली असून त्याविषयी सविस्तर अहवाल केंद्र शासनाकडून दिला जाणार आहे.
“उद्धव ठाकरे यांनी निर्लज्ज राजकारण थांबवावं”; केंद्रीय मंत्र्यांची टीका
रेल्वेद्वारे ऑक्सिजन पुरवठ्याची परवानगी द्या
रस्तेमार्गे ऑक्सिजन वाहतुकीचा कालावधी वाढत असल्याने रेल्वेच्या माध्यमातून त्याची वाहतुक करण्यात यावी यासाठी केंद्र शासनाने रेल्वे विभागाला निर्देश देण्याची मागणी राजेश टोपे यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्रातील ऑक्सिजन तुटवडा लक्षात घेता अन्य राज्यांतून महाराष्ट्राकडे ऑक्सिजन घेऊन जाणारी वाहने अडविली जाणार नाहीत, याची खबरदारी घेण्याविषयी केंद्रीय गृहसचिवांनी संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे.
कुंभमेळ्यात कोरोनाचा उद्रेक; निरंजनी आखाड्याच्या २२ संतांना लागण, २४ तासांत ५९२ नवे रुग्ण
जास्तीत जास्त प्लांट महाराष्ट्राला मिळावेत
हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणाऱ्या यंत्रांचे वाटप केंद्र शासनाच्या माध्यमातून केले जाणार आहे. देशभरात १३२ प्लांट देण्यात येणार असून महाराष्ट्रातील स्थिती लक्षता घेता त्यातील जास्तीत जास्त प्लांट महाराष्ट्राला मिळावेत. तसेच रेमडेसीवरील निर्यात बंदीमुळे १५ कंपन्यांच्या आहे, जो साठा शिल्लक आहे त्यातील अधिकाधिक महाराष्ट्राला मिळावे, अशीही मागणी टोपे यांनी यावेळी केली.
“पंतप्रधान मोदींना ‘मृत्यूचा उत्सव’ साजरा करण्याची हौस”
विधी व न्याय विभागाशी चर्चा
रेमडेसीवीरचा तुटवड्यामुळे राज्यातील स्थानिक औषध उत्पादक कंपन्यांना त्याच्या उत्पादनासाठी तांत्रिक सहकार्य आणि परवानगी देण्यासाठी विधी व न्याय विभागाशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. तसेच ज्याप्रमाणात लस उपलब्ध होईल तसे त्याचा पुरवठा केला जाईल, असे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.