शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातही  मोदी - शहांविरुद्ध  ‘राज’ यांची तोफ धडाडणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 17:52 IST

राज ठाकरे व शरद पवार यांची अलिकडच्या काळातील जवळीक पाहता राज ठाकरे पुण्यात सभा घेतील असा अंदाज राजकीय वर्तुळातून वर्तविला जात होता.

ठळक मुद्देयेत्या १८ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता ही सभा होणार

पुणे : आगामी लोकसबा निवडणुकीत मोदी- शहा आणि अर्थातच भाजपा शिवसेना प्रणित महायुतीविरोधात दंड थोपटलेले राज ठाकरेंची तोफ  येत्या १८ एप्रिलला धडाडणार आहे. सिंहगड रस्त्यावरील गोेयल गंगा मैदानावर सायंकाळी ५ वाजता ही सभा होणार आहे. पुण्यातील काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीसह मनसे कार्यकर्त्यांनी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राज यांनी पुण्यात सभा घ्यावी अशी इच्छा व्यक्त केली होती.  पुण्यात काँग्रेसचे मोहन जोशी व बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, मावळमधून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार व शिरुरमधून डॉ. अमोल कोल्हे लोकसभेच्या रिंगणात आहे्. त्यामुळे या सर्व लढतींच्या दृष्टीने राज ठाकरे यांची पुण्यातील सभा निर्णायक भूमिका बजावू शकते असा अंदाज आघाडीसह मनसे कार्यकर्त्यांचा आहे. राज ठाकरे व शरद पवार यांची अलिकडच्या काळातील जवळीक पाहता राज ठाकरे पुण्यात सभा घेतील असा अंदाज राजकीय वर्तुळातून वर्तविला जात होता.  बुधवारी तो खरा ठरला. राज ठाकरे यांनी मोदी शहा यांच्या भाजपा सरकारविरोधात दंड थोपाटले असून राज्यात मुंबई, उस्मानाबाद., नाशिक , ठाणे, औरंगाबाद अशा विविध ठिकाणी १० - १२ सभा गेण्याचे जाहीर केले होते. आता त्यात पुण्याची भर पडली आहे. राज यांनी मागील काही सभांमध्ये मोदी शहा यांच्याविरुद्ध चांगलेच आक्रमक होत राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. तसेच आपल्या टीकेची धार तीव्र करत ते पुण्यात काय बोलतील याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. ठाकरे यांनी मनसे लोकसभा निवडणुक लढविणार  नसल्याचे जाहीर करतानाच मतदारांना कोणालाही फायदा होवू द्या. पण भाजपा प्रणित महायुतीला मतदान करु नका असे आवाहन प्रत्येक सभेत केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळ्या ठिकाणी मनसेवर तोंडसुख घेताना मनसे आता उनसे म्हणजेच उमेदवार नसलेली सेना झाली असल्याची कडवट टीका केली होती. त्यांच्या टीकेला राज ठाकरे पुण्यात कसे प्रत्युत्तर देता हेही पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRaj Thackerayराज ठाकरेcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार