Raj Thackreay Speech: शरद पवार मोदींची सारखी भेट का घेतात, पुढचा कोण, नावे सांगायला? राज ठाकरेंनी घेतला सुप्रिया सुळेंचा खरपूस समाचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 20:26 IST2022-04-12T20:16:41+5:302022-04-12T20:26:21+5:30
Raj Thackeray Speech on Supriya Sule remark: एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरी ईडीची रेड पडते आणि सुप्रिया सुळेंच्या घरी पडत नाहीत, याचे कारण काय. अजित पवारांवर बोलताना राज ठाकरेंनी शेवटचे ला़डके अजित पवार काय म्हणतात पहा, असे म्हणत समाचार घेतला.

Raj Thackreay Speech: शरद पवार मोदींची सारखी भेट का घेतात, पुढचा कोण, नावे सांगायला? राज ठाकरेंनी घेतला सुप्रिया सुळेंचा खरपूस समाचार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशीदीच्या भोंग्यावरून भूमिका जाहीर केली आणि सुप्रिया सुळेंनी ईडीची नोटीस येताच राज ठाकरेंनी भूमिका बदलल्याचा आरोप केला होता. यावरून राज ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे.
एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरी ईडीची रेड पडते आणि सुप्रिया सुळेंच्या घरी पडत नाहीत, याचे कारण काय. शरद पवार एकावर छापा पडला की दुसऱ्या माणसाचे नाव सांगायला पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतात. पुढचा माणूस कोण हे ते त्यांना सांगत असतील. देशमुख आत गेले पवारांनी भेट घेतली, अजित पवारांच्या नातलगांवर रेड पडली पवारांनी मोदींची भेट घेतली, राऊतांवर कारवाई झाली, पवारांनी भेट घेतली. पुतण्यावर ईडी कारवाई करते, आणि मोदींशी पवारांचे चांगले संबंध कसे काय, असे सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केले.
सुप्रिया सुळेंवर काय बोलणार, ह्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे. जयंत पाटलांना जंत पाटील म्हणत मिमिक्री केली. चकीत चंदू अशी उपमा दिली. सारखे आश्चर्य त्यांच्या चेहऱ्यावर. संपलेल्या पक्षावर मी काय बोलणार, येऊन बघा हा काही संपलेला पक्ष आहे का, अशा शब्दांच राज ठाकरे यांनी जयंत पाटलांचा समाचार घेतला. भुजबळ तुरुंगात जाऊन आले तरी मंत्री झाले., असेही राज ठाकरे म्हणाले.
अजित पवारांवर काय बोलले... (Raj Thackeray speek on Ajit Pawar )
अजित पवारांवर बोलताना राज ठाकरेंनी शेवटचे ला़डके अजित पवार काय म्हणतात पहा, असे म्हणत समाचार घेतला. मी कधी कधी कोणती गोष्ट बोललो हे नीट आठवते. तुमच्या माहितीसाठी मी तीन व्हिडीओ आणलेत. असे सांगत लाव रे तो व्हिडीओची पुन्हा प्रचिती दिली. सोक्ष मोक्ष लावलेला बरा असतो, सकाळचा जो शपथविधी झाला, त्यानंतर शरद पवारांनी जो आवाज काढला त्यानंतर अजित पवारांच्या कानात पुढचे तीन चार महिने कू असा आवाज येत होता. त्यामुळे मी काय बोललो ते त्यांना ऐकू आले नाही, असे म्हणत त्यांनी आपलेच काही व्हिडीओ लावले.