राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरेंचा सोमवारी साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2017 20:33 IST2017-12-10T15:10:10+5:302017-12-10T20:33:31+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेयांचा उद्या साध्या पध्दतीने मिताली बोरूडे यांच्याशी साखरपुडा होणार आहे.

raj thackerays son amit thackeray and mitali borude to get engaged with | राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरेंचा सोमवारी साखरपुडा

राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरेंचा सोमवारी साखरपुडा

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा उद्या साखरपुडा होणार आहे. साध्या पध्दतीने मिताली बोरूडेसोबत अमितचा साखरपुडा होणार आहे. मिताली फॅशन डिझायनर असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, उद्या राज ठाकरेंच्या लग्नाचा वाढदिवसही आहे. त्यामुळे याच मुहूर्तावर दोघांचा साखरपुडा केला जाणार आहे.

मिताली आणि अमित ठाकरे हे बालमित्र आहेत. मैत्रीचं रुपांतर प्रेमात आणि आता विवाहबंधनात होणार आहे. अमित ठाकरे हे सध्या राजकारणापासून अलिप्त आहेत. ठाकरे घराण्यात बऱ्याच दिवसानंतर सनईचौघडा वाजणार असल्यामुळे उद्या अमित यांच्या साखरपुड्याला कोणकोण येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अतिशय मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत अतिशय साध्या पध्दतीने हा साखरपुडा होणार आहे.  कृष्णकुंज या निवासस्थानावर घरगुती पद्धतीनं हा साखरपुडा होईल अशी माहिती आहे.

 

Web Title: raj thackerays son amit thackeray and mitali borude to get engaged with