Raj Thackeray : "राज ठाकरेंचं पहिलं प्रेम...", 'व्हॅलेंटाइन डे'निमित्त मनसेनं शेअर केला खास Video

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 12:17 PM2024-02-14T12:17:15+5:302024-02-14T12:26:42+5:30

Raj Thackeray And Valentine Day : मनसेने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये राज यांनी आपल्या पहिल्या प्रेमाबद्दल सांगितलं आहे. 

"Raj Thackeray's first love...", MNS shared a special video on the occasion of 'Valentine's Day' | Raj Thackeray : "राज ठाकरेंचं पहिलं प्रेम...", 'व्हॅलेंटाइन डे'निमित्त मनसेनं शेअर केला खास Video

Raj Thackeray : "राज ठाकरेंचं पहिलं प्रेम...", 'व्हॅलेंटाइन डे'निमित्त मनसेनं शेअर केला खास Video

फेब्रुवारी महिन्याची उत्सुकता ही केवळ Valentine Day साठी अनेकांना असते. गालावर हास्याची कळी उमलवणाऱ्या, खूप दिवस मनात साठवून राहिलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी, विविध प्रेममय डेजच्या रंगात रंगून जाण्यासाठी लोक व्हॅलेंटाइन वीकची वाट पाहत असतात. याच दरम्यान आता मनसेने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये राज यांनी आपल्या पहिल्या प्रेमाबद्दल सांगितलं आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून 'राजसाहेबांचं पहिलं प्रेम' असं कॅप्शन देत राज ठाकरे यांच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये राज यांनी आपल्या मनातील पहिल्या प्रेमाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचं पहिलं प्रेम हे क्रिएटीव्हिटीवर असल्याचं सांगितलं आहे. मनसेने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये  राज ठाकरे यांचे विविध फोटो देखील पाहायला मिळत आहे. 

"खरं तर माझं पहिलं प्रेम आहे ते क्रिएटीव्हिटीवर. याचा परत राजकारणाशी किंवा माझ्या पक्षाच्या नावाशी काही विषय नाही. परंतु काहीतरी नवीन क्रिएट करत राहणं. एखादी गोष्ट नवीन क्रिएट होणं, मला असं वाटतं माझं पहिलं प्रेम त्यावरती आहे. मग ते व्यंगचित्र या स्वरुपात असेल, मग ते राजकारण या स्वरुपात असेल. ते एनिमेशन असेल किंवा इतर कुठचाही फॉर्म जो काही नवीन क्रिएट करतो... मला असं वाटतं माझं पहिलं प्रेम त्याच्यावरती आहे" असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

Web Title: "Raj Thackeray's first love...", MNS shared a special video on the occasion of 'Valentine's Day'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.