राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

By Admin | Updated: June 10, 2016 04:46 IST2016-06-10T04:46:28+5:302016-06-10T04:46:28+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.

Raj Thackeray took a meeting with the Chief Minister | राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट


मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. नीट परीक्षेमुळे राज्यातील वैद्यकीय प्रवेशांबाबत निर्माण झालेल्या संभ्रमात राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या हिताची भूमिका मांडली. त्यामुळे यंदा तरी राज्यातील विद्यार्थ्यांचा सीईटीद्वारे प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी घेतलेल्या भूमिकेबाबत आभार मानण्यासाठी राज यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या भेटीत सुमारे अर्धा मुख्यमंत्री आणि राज यांच्या दरम्यान बंद दरवाज्याआड चर्चा झाल्याने या भेटीमागे राजकीय कारण असल्याचे बोलले जात आहे.
राज सकाळी १०च्या सुमारास वर्षा बंगल्यावर दाखल झाले. त्यानंतर मुख्यमंत्री, राज ठाकरे आणि पालकांची सुमारे २० मिनिटे चर्चा झाली. (प्रतिनिधी)

Web Title: Raj Thackeray took a meeting with the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.