'आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला, इथेच गाडला'; राज ठाकरे म्हणाले औरंगजेबाच्या कबरीवर बोर्ड लिहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 21:01 IST2025-03-30T21:00:29+5:302025-03-30T21:01:08+5:30

Raj Thackeray Speech Gudhi Padwa Melava: अफजलखान जेव्हा प्रतापगडावर मारला गेला तिथेच त्याला पुरला. त्याला पुरला ते शिवाजी महाराजांच्या होकाराशिवाय झाले नसेल, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

Raj Thackeray Speech Gudhi Padwa Melava:'He who came to destroy us Marathas, buried him here'; Raj Thackeray said, remove Aurangzeb's decorated tomb | 'आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला, इथेच गाडला'; राज ठाकरे म्हणाले औरंगजेबाच्या कबरीवर बोर्ड लिहा

'आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला, इथेच गाडला'; राज ठाकरे म्हणाले औरंगजेबाच्या कबरीवर बोर्ड लिहा

Raj Thackeray Speech Gudhi Padwa Melava: मराठे सर्व लढाया हरत होते, पण औरंगजेब एकही लढाई जिंकू शकत नव्हता. छत्रपती शिवाजी, संभाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर तो दिल्लीला गेला असता. मोठा राजा होता. पण त्याला शिवाजी नावाची भीती वाटत होती. त्यामुळे तो दोन अडीज जिल्ह्यांसाठी इथेच थांबला होता. जी कबर आहे ना, ती सजवलेली काढून टाका तिथे फक्त कबर दिसुद्या. तिथे  एक मोठा बोर्ड लावा. आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला, हा आमचा इतिहास असल्याचे राज ठाकरे म्हणाले. 

जरा जपून म्हणून सांगायला नेमके आजच फोन आले; अर्थ मला समजतो, राज ठाकरेंनी केला गौप्यस्फोट 

अफजलखान जेव्हा प्रतापगडावर मारला गेला तिथेच त्याला पुरला. त्याला पुरला ते शिवाजी महाराजांच्या होकाराशिवाय झाले नसेल. महाराजांना विचारल्याशिवाय ते केले नसेल. जगाला कळू दे इथे कोणाला गाडलेय. महाराजांनी विचार केला नसेल. मुलांच्या सहली बसेस भरून घेऊन जा, त्यांना सांगा आपल्या महाराजांनी याला गाडला. पुढच्या पिढीला काय सांगणार आहोत. तरुणांना विनंती आहे, इतिहास व्हॉट्सअपवर वाचायचे बंद करा. जर वाचत असाल तर तुम्ही त्या पक्षाला बांधले जाल. मुळात विषय वेगळे असतात आणि तुम्हाला भरकटविले जाते. मुंबईचा विमानतळ दिला अदानीला, नवी मुंबईचा अदानीला, बंदर दिले अदानीला, तो हुशार निघाला आणि आम्ही अडाणी ठरलो, अशी टीका राज यांनी केली. 

अफजलखानाचा वकील कुलकर्णी नावाचा ब्राम्हण होता. शिवाजी महाराजांचा वकीलही ब्राम्हणच होता. तेव्हा सगळी माणसे कोणा ना कोणाकडे कामाला होती. त्यावेळेला काय निर्णय कोणत्या परिस्थितीत घेतले गेले असतील काय माहिती. आता साडेतीनशे वर्षांनी का चर्चा केली जातेय. महाराजांच्या समोर संभाजी महाराजांनी औरंगजेबाची ५०००ची मनसबदारी स्वीकारली होती. महाराजांचा होकार असल्याशिवाय होईल. आता दरबारात अडकलोय, पुढचे पुढे पाहू, राजकारण असते ते. या आताच्या लोकांना कशाचे काही माहिती नाही. मिर्झाराजे हिंदू होता ना. सिंहगडावर तानाजी लढले तो कोण होता उदयभान रजपूत, हिंदू होता ना. कोणत्या काळात जगतोय आपण, असा सवालही राज यांनी केला. 

Web Title: Raj Thackeray Speech Gudhi Padwa Melava:'He who came to destroy us Marathas, buried him here'; Raj Thackeray said, remove Aurangzeb's decorated tomb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.