शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
'मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली'; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
5
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
6
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
7
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
8
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
9
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
10
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
11
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
12
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
13
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
14
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
15
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
16
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
17
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
18
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
19
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
20
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल

Video : अमित ठाकरेंचं आवाहन; मनसे महाराष्ट्रभर राबवणार 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2021 12:53 PM

MNS Leader Amit Thackeray : ११ डिसेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेद्वारे महाराष्ट्रभर 'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम' राबवण्यात येणार आहे. अमित ठाकरेंनी व्हिडीओ शेअर करत केलं आवाहन.

MNS Leader Amit Thackeray Campagn: महाराष्ट्रातील समुद्रकिनारे स्वच्छ करण्यासाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पुढाकार घेतला आहे. ११ डिसेंबर रोडी सकाळी १० ते १ या कालावधीत मनसेद्वारे महराष्ट्रात 'समुद्र किमारा स्वच्छता मोहीम' राबवण्यात येणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS leader Raj Thackeray) यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी यांनी व्हिडीओ शेअर करत मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे."मी आज माझ्या मनाच्या जवळचा एक मुद्दा घेऊन तुमच्या समोर आलोय. महाराष्ट्राला लाभलेल्या ७२० किमी लांबीच्या समुद्रकिनाऱ्याची निगा राखण्यात आपण कुठेतरी कमी पडतोय असं वाटतं. परदेशातील समुद्र किनारे इतके स्वच्छ आणि सुंदर का असतात असं कोणालातरी मनात वाटतच असेल, आपल्या राज्यातील का असू शकत नाही. आपल्याला एकत्र येऊन पर्यावरणाचा ऱ्हास थांबवला पाहिजे," असं आवाहन अमित ठाकरे व्हिडीओद्वारे करताना दिसत आहेत.केवळ सरकारवर अवलंबून नको"फक्त सरकारवर अवलंबून न राहता आपण जबाबदारी घेणं गरजेचं आहे. जगभरातील विविध देशात समुद्राचे आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी मोहीम राबवली जाते. सर्वसामान्य लोकही याबाबत जागरुक आहेत आणि त्यांना याबाबतची जाण आहे. महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेद्वारे मुंबईतील दादर-माहिम किनाऱ्यांवर सलग चार वर्ष स्वच्छता मोहीम राबवून त्याचा कायापालट घडवून आणला. आता अशीच मोहीम महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण महाराष्ट्रात राबवणार आहे. ही मोहीम महाराष्ट्रातील ४० समुद्र किनाऱ्यांवर येत्या ११ डिसेंबरपासून रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत राबवण्यात येणार आहे. जर आपल्या जवळचे समुद्र किनारे स्वच्छ आणि सुंदर असावेत अशी तुमचीही इच्छा असेल, तर आमच्या या मोहीमेत मोठ्या संख्येनं सहभागी व्हा. आपल्या सर्वांच्या मेहनतीनं हे समुद्र किनारे स्वच्छ होतील, याची मला खात्री आहे," असंही ते व्हिडीओद्वारे म्हणाले.

टॅग्स :Amit Thackerayअमित ठाकरेMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे