शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

सरदार पटेलांवरून राजकारण कऱणाऱ्या मोदींना राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून पढवला इतिहास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2018 20:40 IST

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर भाषण करताना सरदार पटेलांचे नाव घेऊन राजकीय टीका करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राज ठाकरे यांनी व्यंगचित्रामधून फटकारले लावले आहेत.

मुंबई - राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर भाषण करताना सरदार पटेलांचे नाव घेऊन राजकीय टीका करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राज ठाकरे यांनी व्यंगचित्रामधून फटकारले लावले आहेत. पटेलांना डावलून नेहरूंना पंतप्रधान केल्याने पटेलांवर अन्याय झाल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि नेहरू-गांधी घराण्यावर घणाघाती टीका करणाऱ्या मोदींना राज ठाकरे यांनी आज प्रसिद्ध केलेल्या नव्या व्यंगचित्रामधून इतिहास पढवला आहे.  राज ठाकरे यांनी आज प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्रामध्ये महात्मा गांधी,  जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर प्रकट झाल्याचे दाखवण्यात आले आहे. यावेळी महात्मा गांधी भारताचा इतिहास नावाचे पुस्तक हातात घेऊन आपल्यासमोर बसलेल्या मोदी आणि अमित शहा यांना इतिहास पढवत असून, नेहरू यांना काँग्रेसने नव्हे तर आपणच पंतप्रधान केल्याचे सांगत असल्याचे सांगत आहेत. तसेच नेहरू हे गृहमंत्री असते तरी ते काँग्रेसचे नेते असल्याचे ठणकावत असल्याचे दाखवण्यात आले आहे. गांधीजींचे हे वक्तव्य ऐकल्यावर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे चेहरे पाहण्यासारखे झाल्याचे दिसत आहे. भारताचे तुकडे काँग्रेसनेच केले. तुमच्या पापाची किंमत देशाला मोजावी लागत आहे. सरदार पटेल पंतप्रधान असते, तर काश्मीर भारताच्या ताब्यात असता, अशी आरोपवजा टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संसदेत केली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावावर बोलताना, मोदींनी दोन्ही सभागृहांत दीड तासांची भाषणे केली. त्या वेळी सभागृहांत काँग्रेस, तेलगू देसमसह अन्य विरोधकांची घोषणाबाजी व गदारोळ सुरू होता, दरम्यान, हा विषय घेऊन राज ठाकरेंनी मोदींवर टीका केल्याने पुढच्या काही दिवसांमध्ये राजकारण तापण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेCartoonistव्यंगचित्रकारNarendra Modiनरेंद्र मोदीMahatma Gandhiमहात्मा गांधी