शहरं
Join us  
Trending Stories
1
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
2
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
3
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
4
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
5
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
6
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
7
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
8
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
9
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
10
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
11
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
12
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
13
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
14
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
15
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
16
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
17
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
18
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
19
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
20
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
Daily Top 2Weekly Top 5

राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 13:05 IST

"यांनी कितीही जोड-तोड केलं, तरीही महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पराभव पत्करावाच लागेल. जनतेचा हाच कौल राहणार आहे..."

राज्यात लवकरच महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीव मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा संपूर्ण राज्यभरात रंगत आहेत. मात्र असे असतानाच मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानकपणे वांद्रे येथील ताज लँड्स अँडमध्ये भेटल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान रज-फडणवीस भेटीसंदर्भात काँग्रेस नेते नाता पटोले यांनी भाष्य केले आहे.

पटोले म्हणाले, "भाजप हा चोवीस तास राजकारण करणारा पक्ष आहे. सत्तेवर कसे यावे? यावर त्यांचे काम चालते आणि सत्तेवर आल्यानंतर, लुटपाट करून आपली घरे कसे भरता येतील? यावर काम करणारा हा पक्ष आहे. दुसऱ्याच्या घरी आग लावणे दुसऱ्याचे घर तोडणे, त्यात भाजप एक्सपर्ट आहे. कालपर्यंत हे राज ठाकरे यांना शिव्या घालत होते. कारण राजठाकरे यांनी, 'ऑपरेशन सिंदूर'संदर्भात जी काही भूमिका मांडली होती, त्यावरून त्यांना ट्रोल करणारी भाजपचीच मंडळी होती. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महागाई वाढत आहे. राज्यात हाहाकार आहे. मात्र त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही आणि ते पॉलिटिकल पोळ्या शेकायचेच काम करत असतील तर, त्यावर फार काही बोलावे असे मला वाटत नाही." ते टीव्ही९सोबत बोलत होते.

पटोले पुढे म्हणाले, त्यांच्या (भाजप) डोक्यात २४ तास राजकारण सुरू असते. सत्ता कशी घेता येईल? यावर त्यांचे काम सुरू असते आणि मोजी असोत अथवा फडणवीसजी ते २४ तास तेच करत असतात. यासंदर्भात फार काही चर्चा करावी असे मला वाटत नाही. यामुळे मी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करतो.

महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पराभव पत्करावाच लागेल -आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना पटोले म्हणाले, या सरकारने जोड-तोड करण्याचे कितीही प्रयत्न केले तरी काहीही होणार नाही. महाराष्ट्रातील जनता या भ्रष्ट आणि धोकेबाज महायुतीच्या सरकारपासून त्रासलेली आहे. यामुळे राज्यातील जनतेने निर्णय केलेला आहे. या निवडणुका चारवर्षांनंतर होत आहेत. माननीय सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्याच्या आत निवडणुका घ्याव्यात अशी सूचना देऊनही, या निवडणुकीला ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाचेही ऐकायचे नाही. निवडणुका आपल्या सोयीप्रमाणे करायच्या, अशापद्धतीचे हे काम आहे. मात्र, यांनी कितीही जोड-तोड केलं, तरीही महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पराभव पत्करावाच लागेल. जनतेचा हाच कौल राहणार आहे.

 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेRaj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारणElectionनिवडणूक 2024Uddhav Thackerayउद्धव ठाकरे