पावसासोबत चातकही दिसेनासा
By Admin | Updated: July 3, 2014 01:41 IST2014-07-03T01:40:20+5:302014-07-03T01:41:24+5:30
मे महिन्याच्या अखेरीस आपल्या मधुर गुंजनाने मोहिनी घालणारा मेघदूत चातक बेपत्ता झाला आहे.

पावसासोबत चातकही दिसेनासा
दीपक जोशी /अकोला
दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून महिन्याच्या प्रारंभी शहराच्या परिसरात आपल्या मधुर गुंजनाने मोहिनी घालणारा मेघदूत चातक बेपत्ता झाला आहे.
वर्षभर पावसाची वाट पाहून केवळ पडणार्या पावसाचे पाणीच प्राशन करून आपली तहान भागविणारा चातक पक्षी आपल्या सर्वांंना परिचित असेल. शाळा-महाविद्यालयीन शिक्षण घेताना अनेक कथा-कवितांमधून हा मेघदूत डोकावतो. तहान भागविण्यासाठी वर्षभर पावसाची वाट पाहणार्या या पक्ष्याच्या नावावरूनच ह्यचातकाप्रमाणे वाट पाहणेह्ण हा वाक्प्रचार उदयास आला असेल कदाचित. पाणी हेच जीवन आहे, अशी उपमा मानवाने पाण्याला दिली आहे, ती केवळ मानवापूर्तीच र्मयादित नसून, भूतलावर वावरणार्या सर्वच प्राणिमात्रांसाठी पशु-पक्ष्यांसाठी लागू पडते. मेघगर्जनेसेह बरसणार्या सरींचे पाणी वरचेवर टिपून आपली तहान भागविण्याचा जगावेगळा अट्टहास चातक पक्षी करीत असतो. मृग नक्षत्राला प्रारंभ होताच जीवनाची आस प्रफुल्लित झालेला हा पक्षी आपल्या मधुर गुंजनाने मोहिनी घालत एका झाडावरून दुसर्या झाडावर फिरत असतो.
यंदा पावसाळा सुरू होऊन महिना उलटून गेला असला तरी पावसाचा एकही थेंब बरसलेला नाही. पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. परिणामी दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून महिन्याच प्रारंभी दिसणाचा चातक यंदा दिसेनासा झाला आहे. पावसाच्या पाण्यावरच जीवन अवलंबून असलेल्या या सुमधुर पक्ष्याची विहिनदेखील लांबणीवर पडणार असल्याने भविष्यात चातक पक्ष्यांची संख्या घटण्याची शक्यता नाकारता येणार नाही. चातक पक्ष्याची महती सांगणार्या श्लोकाचेदेखील ऋषी मुनींनी पुराणात वर्णन केले आहे.
मुच्च मुच्च सलिलम, दयानिधे
नास्ती नास्ती समयो विलंबने..
अद्य चातक कुले मृते पुर्नवारी
वारिधर, किम करिष्यसी..
अर्थात - हे मेघांनो, तुम्ही सत्वर पाऊस पाडा, नाहीतर चातक पक्ष्याच्या कुळाचा नाश झाल्यावर तुमच्या त्या पावसाच्या पाण्याचा उपयोग काय?
**चातकाची मायभूमी आफ्रिका
मूळचा आफ्रिकन असला तरी चातक पक्षी पावसाळय़ापूर्वीच भारतात स्थलांतरित होतो.
कोकिळेप्रमाणेच चातक मादी कावळा किंवा सातभाई नामक पक्ष्याच्या घरट्यात अंडी देतो. पावसाळा संपताच चातक पक्षी घातलेली अंडी सोडून परत आफ्रिकेत स्थलांतरित होतात; पण गंमत अशी की, माघारी सोडून गेलेल्या अंड्यांमधून बाहेर पडलेली चातक पक्ष्याची पिल्ले जराशी मोठी झाल्यानंतर तीदेखील आपल्या मायदेशी आफ्रिकेत स्थलांतरित होतात.