शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Rain Update: राज्यात पाऊस सक्रिय; पण सरासरी कमीच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 10:51 IST

Maharashtra Rain Update: मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडत असून राज्यातील बहुतांश ठिकाणी मान्सून पसरला असला तरी हा पाऊस सरासरीपेक्षा कमीच असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.

मुंबई : मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडत असून राज्यातील बहुतांश ठिकाणी मान्सून पसरला असला तरी हा पाऊस सरासरीपेक्षा कमीच असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. शुक्रवारीही कोकण, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाच्या सरी कोसळतील, अशी शक्यता आहे.

गेल्या सात दिवसांत मुंबई उपनगर, पालघर, लातूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात ६० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला. मुंबई शहर, ठाणे, रायगड, सोलापूर,  अहमदनगर आणि नागपूर जिल्ह्यात सरासरीच्या २० ते ५९ टक्क्यांपर्यंत पाऊस झाला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, बीड, परभणी, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात सरासरी पाऊस झाला आहे. तर उर्वरित जिल्हे अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. 

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरला २४ तासांत ११८ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात चोवीस तासांत वेंगुर्ला तालुक्यात ८०.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

नंदुरबारमध्ये दमदारनंदुरबार जिल्ह्यात गुरुवारी पावसाने दमदार हजेरी लावली. नवापूर तालुक्यात २४ तासांत ८७.८ मिमी पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. यामुळे रंगावली नदी दुथडी भरून वाहिली.

टॅग्स :RainपाऊसweatherहवामानMaharashtraमहाराष्ट्र