दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 06:49 IST2025-07-15T06:49:03+5:302025-07-15T06:49:50+5:30

Rain News: १९ जुलैनंतर म्हणजे अखेरीस मोठा पाऊस पडण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविली आहे.

Rain Attendance in city, suburbs; but expect heavy rains | दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा

दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटर्क 
मुंबई : मे महिन्याच्या उत्तरार्धात दाखल झालेल्या मान्सूनने पहिल्याच फटक्यात मुंबईची तुंबापुरी केली. मात्र, तेव्हापासून दीर्घ रजेवर असलेल्या मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आजही मुंबईकर आहेत.

जून महिना तुरळक सरींचा नोंदविला गेला असतानाच पावसाचा महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुलैच्या सुरुवातीलाच धो-धो सरी कोसळतील, अशी शक्यता होती. मात्र, आजवर ही शक्यताही धूसर झाली असून, आता १९ जुलैनंतर म्हणजे अखेरीस मोठा पाऊस पडण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविली आहे. दरम्यान, सोमवारी मुंबई शहरापासून उपनगरापर्यंत चांगल्या पावसाने हजेरी लावली.

उपनगर मात्र कोरडे 
सोमवारी सकाळपासूनच पूर्व व पश्चिम उपनगरात तुरळक सरी कोसळत होत्या. दुपारी वरळी, भायखळा, महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी या परिसरात पावसाने जोर पकडला असतानाच उपनगर मात्र कोरडे होते. सुर्यास्तानंतर किंचित विश्रांती घेतल्यानंतर रात्री ८:०० वाजेच्या दरम्यान मध्य मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली होती.

सोमवारच्या पावसानंतर मंगळवारसह बुधवारी पावसाचा जोर कमी होईल. मात्र १९ जुलैनंतर जुलैच्या अखेरीस मोठ्या पावसाची शक्यता आहे.
अथ्रेय शेट्टी, हवामान अभ्यासक

Web Title: Rain Attendance in city, suburbs; but expect heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस