शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता; २७ व २८ जुलैला पावसात होणार वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2020 19:53 IST

कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला.

ठळक मुद्देगेल्या २४ तासात राज्यात कोकण, गोव्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस

पुणे : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. राज्यातील सर्वत्र हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. २७ व २८ जुलै रोजी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पावसाचे प्रमाण वाढणार आहे. कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.          गेल्या २४ तासात राज्यात कोकण, गोव्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तसेच बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला असून मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. विदर्भात बुलढाणा, चिखलीसह अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला होता. 

शनिवारी दिवसभरात महाबळेश्वर, नाशिक, परभणी, अकोला, अमरावती, गोंदिया तसेच पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अरबी समुद्रावरील वारे हे उत्तरेच्या दिशेने वाहत आहेत. त्यांचे प्रमाण २७ व २८ जुलै रोजी वाढणार आहे. मात्र, त्यावेळी हवेचा दाब राहण्याची शक्यता आहे़ २६ जुलै रोजी मध्य भारतात पावसाची व्यापी वाढणार आहे.

२७ व २८ जुलै रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातही या दोन दिवसात पावसाचे प्रमाण वाढणार आहे़ २८ जुलै रोजी विदर्भातील अनेक भागात चांगल्या पावसाची शक्यता आहे. २८ जुलै रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पुण्यात सायंकाळनंतर पावसाची जोरदार हजेरीशुक्रवारी दिवसभर संततधार पावसानंतर शनिवारी दिवसभर पावसाने उघडीप दिली होती. सायंकाळनंतर शहरात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे़ सिंहगड रोड, मुंढवा, केशवनगर, बावधन, हडपसर, चंदननगर भारात पावसाने रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामान