Rain Alert : 'या' दिवशी अवकाळी पाऊस बरसणार; हवामान विभागाने या जिल्ह्यांना दिला अलर्ट, वाचा सविस्तर

By संतोष कनमुसे | Updated: March 29, 2025 18:45 IST2025-03-29T18:44:03+5:302025-03-29T18:45:57+5:30

Rain Alert : राज्यभरात गेल्या काही दिवसापासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. अनेक ठिकाणी ४० अंश तापमानाची नोंद झाली आहे.

Rain Alert Unseasonal rains will occur on 31 march Meteorological Department has issued an alert to these districts, read in detail | Rain Alert : 'या' दिवशी अवकाळी पाऊस बरसणार; हवामान विभागाने या जिल्ह्यांना दिला अलर्ट, वाचा सविस्तर

Rain Alert : 'या' दिवशी अवकाळी पाऊस बरसणार; हवामान विभागाने या जिल्ह्यांना दिला अलर्ट, वाचा सविस्तर

Rain Alert ( Marathi News ) : राज्यभरात गेल्या काही दिवसापासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. अनेक ठिकाणी ४० अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर मध्य महाराष्ट्रात ३८-४० अंशाची नोंद झाली आहे. दोन दिवसापासून उकाडा वाढला आहे. दरम्यान, आता हवामान विभागाने पुढील काही दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. अवकाळी पावसाबाबत पुणे आयएमडी वेधशाळेचे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करुन माहिती दिली आहे.

उद्या म्हणजेच ३० मार्चपासून राज्यभरात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण महाराष्ट्रात आधी अवकाळी बरसणार आहे. या महिन्याच्या म्हणजेच मार्चच्या ३१ तारखेला ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत पाऊस बरसण्याचा अंदाज दिला आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. 

फडणवीसांच्या स्वागताला हर्षवर्धन पाटील हजर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

हवामान विभागेन १ एप्रिलला विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अनेक ठिकाणी येलो अलर्ट दिला आहे. २ एप्रिलला पू्र्ण महाराष्ट्रात अवकाळीचा अंदाज दिला आहे. 

या जिल्ह्यांना अलर्ट दिला

३१ मार्च

ठाणे, पालघर, नाशिक, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना अलर्ट दिला आहे. 

१ एप्रिल

ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

२ एप्रिल

मध्य माहाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात येलो अलर्ट दिला आहे. तसेच पूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिला आहे. 

Web Title: Rain Alert Unseasonal rains will occur on 31 march Meteorological Department has issued an alert to these districts, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस