शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले...
2
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
3
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
4
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
5
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
6
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
7
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
8
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
9
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
10
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
11
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
12
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
13
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
14
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
15
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
16
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
17
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
18
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
19
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
20
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन

सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 07:41 IST

गुजरातमध्ये कोसळणारा परतीचा पाऊस ६ ते ८ ऑक्टोबरदरम्यान मुंबईसह राज्यभरात पुन्हा बरसेल.

मुंबई : गुजरातमध्ये कोसळणारा परतीचा पाऊस ६ ते ८ ऑक्टोबरदरम्यान मुंबईसह राज्यभरात पुन्हा बरसेल. ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसतील. तर १२ ऑक्टोबरनंतर मान्सून एक्झिट घेईल, असा अंदाज आहे. ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्या म्हणण्यानुसार, हवामान विस्तारित श्रेणीच्या अंदाजानुसार, मध्य भारत व महाराष्ट्राच्या काही भागात दुसऱ्या आठवड्यात पावसाची शक्यता आहे.

चक्रीवादळ ‘शक्ती’गेल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात दाखल झाले. त्यामुळे मुंबईत पाऊस पडला. हे क्षेत्र अरबी समुद्रात दाखल झाल्यावर त्याचे रूपांतर ‘शक्ती’ चक्रीवादळात झाले. मुंबईपासून ८०० सागरी मैलांवर गुजरातपासून पश्चिम-दक्षिण दिशेला हे वादळ आहे. ७ ऑक्टोबरपर्यंत हे वादळ गुजरातकडे सरकेल. मात्र, तोवर त्याचा जोर कमी होईल. मुंबईला या वादळाचा धोका नाही, अशी माहिती हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी दिली.

ऑक्टोबर तापदायक नसेलयंदा ऑक्टोबर हीटचा त्रास जाणवणार नाही. त्यामुळे हा महिना तितकासा तापदायक नसेल. ऑक्टोबरमध्ये मुंबईचे कमाल तापमान ३६ किंवा ३७ अंश नोंदविण्यात येते. यावर्षी कमाल तापमान ३२ ते ३३ अंशांपर्यंत राहील. अशीच कमी-अधिक स्थिती राज्यभरात राहील, असा अंदाज आहे. त्यामुळे हीटपासून सुटका होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Braces for Return Showers Due to Cyclone 'Shakti': Forecast

Web Summary : Maharashtra anticipates renewed rainfall from October 6-8 due to Cyclone 'Shakti', weakening near Gujarat. Mumbai faces no direct threat. October heat will be less intense with temperatures remaining moderate across the state, bringing relief.
टॅग्स :Rainपाऊसweatherहवामान अंदाजMaharashtraमहाराष्ट्र