शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 14:31 IST

Raigad Savitri River Boat Capsizes: रायगड जिल्ह्यातील पोलादपूरजवळ सावित्री नदीत बचाव पथकाची बोट पाण्यात उलटली.

रायगड जिल्ह्यातील पोलादपूरजवळ सावित्री नदीत सोमवारी (२३ जून) संध्याकाळी प्रवाहात बुडालेल्या एका तरुणाचा शोध घेत असताना बचाव पथकाची बोट उलटली.   सुदैवाने, या घटनेत कोणताही जीवितहानी किंवा कोणतीही दुखापत झाली नाही. बोट नदीत उलटल्यानंतर बचाव पथकातील जवानांनी पोहत किनारा गाठून स्वत:चा जीव वाचवला. एआयएनएस वृत्त संस्थेने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी सावित्री नदीत पोहणाऱ्या तीन तरुणांपैकी एक तरुण अचानक पाण्याच्या प्रवाहात ओढला गेला आणि तो बेपत्ता झाला. नरवीर, काळभैरवनाथ व साळुंखे रेस्क्यू टीम यांच्यासह आपदा मित्र यांनी बेपत्ता तरुणाचा सायंकाळपर्यंत शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. या तरुणाचा शोध घेण्यासाठी बचाब पथकातील जवान बोटीसह नदीत उतरले. परंतु, पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे बचाव पथकाची बोट उलटली.  बोट उलटल्यानंतर जवानांनी ताबडतोब पाण्यात उड्या घेतल्या आणि पोहोत किनारा गाठला. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

जोगेश सुरेन ओरन (वय, २१) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. जोगेश हा लॉर्सन अँड टुब्रो कंपनीतील कंत्राटी कामगार असल्याची माहिती आहे. जोगेश हा आपल्या दोन सहकाऱ्यांसह नदीत पोहोण्यासाठी गेला होता. परंतु, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो नदीत वाहून गेला, असे सांगण्यात आले.

टॅग्स :RaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्र