"राहुल शेवाळे महिलेला घेऊन परदेशात गेलेले, बायको रडत आलेली, उद्धव ठाकरेंनी भानगड मिटवली"
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 12:44 IST2022-12-22T12:42:18+5:302022-12-22T12:44:43+5:30
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव घेत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी गंभीर आरोप केले आहेत.

"राहुल शेवाळे महिलेला घेऊन परदेशात गेलेले, बायको रडत आलेली, उद्धव ठाकरेंनी भानगड मिटवली"
औरंगाबाद-
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव घेत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांकडून शेवाळे यांच्याविरोधात जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. यात माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शेवाळे यांच्याबाबत काही गौप्यस्फोट केले आहेत.
४४ कॉल्स करणारा AU कोण? स्वत: रिया चक्रवर्तीनं केला होता खुलासा, म्हणाली...
"राहुल शेवाळे यांची तर अनेक लफडी आहेत. ते एका महिलेला घेऊन परदेशात गेले होते. त्यावेळी त्यांची बायको उद्धव ठाकरे साहेबांकडे रडत आली होती. मग ती भानगड उद्धव साहेबांनी मिटवली होती", असं चंद्रकांत खैरे म्हणाले.
शेवाळेंचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी थेट लोकसभेत आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह रजपूत याच्या मृत्यूचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला. सुशांतसिंह रजपूर यांच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीला AU नावाने ४४ कॉल आले होते. AU म्हणजे आदित्य आणि उद्धव आहेत का? असा प्रश्न लोकसभेत खासदार राहुल शेवाळे यांनी उपस्थित केला. लोकसभेत हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर महाराष्ट्राचे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"