राहुल गांधींचे विधान हास्यास्पद, त्यांनी माझे नाव घेतले नसले तरी...; अशोक चव्हाणांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 08:02 IST2024-03-19T08:00:26+5:302024-03-19T08:02:28+5:30

राहुल गांधी यांनी शिवाजी पार्कच्या सभेत एक किस्सा सांगितला होता

Rahul Gandhi's statement ridiculous, even though he didn't mention my name...; Explained by Ashok Chavan | राहुल गांधींचे विधान हास्यास्पद, त्यांनी माझे नाव घेतले नसले तरी...; अशोक चव्हाणांचे स्पष्टीकरण

राहुल गांधींचे विधान हास्यास्पद, त्यांनी माझे नाव घेतले नसले तरी...; अशोक चव्हाणांचे स्पष्टीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: काँग्रेसचे एक नेते पक्ष सोडताना सोनिया गांधी यांना भेटले आणि रडले, असे विधान राहुल गांधी यांनी केले आहे. त्यांनी माझे नाव घेतले नसले तरी ते माझ्यासंदर्भात असेल तर निव्वळ हास्यास्पद आहे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री व भाजपचे नेते अशोक चव्हाण यांनी दिली.

राजीनामा देण्यापूर्वी मी सोनिया गांधींना भेटलेलो नाही. त्यामुळे त्यांना भेटून मी काही भावना व्यक्त केल्याचे विधान चुकीचे व दिशाभूल करणारे, तथ्यहीन आहे. मी पक्ष सोडण्यापूर्वी शेवटपर्यंत काँग्रेसच्या मुख्यालयात काम करत होतो. विधानसभा अध्यक्षांकडे माझ्या आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केल्यानंतरच ही माहिती समोर आली. त्यानंतर मी पक्षाचाही राजीनामा दिला. त्यामुळे मी पक्ष सोडेपर्यंत त्याविषयीची माहिती कोणालाही नव्हती, असेही चव्हाण म्हणाले.

Web Title: Rahul Gandhi's statement ridiculous, even though he didn't mention my name...; Explained by Ashok Chavan